समाज सेविका हनिफा पाल यांची विविध पदांवर नियुक्ती

समाज सेविका हनिफा पाल यांची विविध पदांवर नियुक्ती

माणगांव (प्रतिनिधी) – माणगांव तालुक्यातील हरकोल येथील राहणाऱ्या हनिफा शुऐब पाल या शिक्षिकेला समाजाच्या प्रति असणाऱ्या बांधिलकीतून समाजसेवा करण्यांचा छंद व आवड निर्माण झाली आहे. त्यांनी खिदमते खलक या नावाने एक मिशन सुरू केले आहे.
या मिशन मार्फत दिव्यांग व विधवा महिलांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे व विविध शासकीय निधी मिळवून देण्याचे कार्य त्या गेली ४ महिन्यापासून सक्षमपणे करीत आहेत. त्यांची या समाज सेवेची आवड पाहून त्यांची निवड भारतीय मानव अधिकार माणगांव तालुका अध्यक्ष तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा महिला सचिव पदी निवड करण्यात आली आहे. तसेच महाड, पोलादपूर तालुक्यातील कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी हनिफा पाल यांचे वर माणगांव तालुका शिवसेना महिला आघाडी शाखा प्रमुख तर शिवसेना मुस्लिम संघटना माणगांव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हनिफा पाल यांच्यावर विविध संघटनांच्या पदाचा वर्षाव झाला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन मान्यवरांकडून केली जात आहे. तसेच विविध स्तरावरून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब