पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावताम मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

इमेज
इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता म मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका-    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही          लोकमानस प्रतिनिधी  , मुंबई  :  इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ ,  सारथी ,  बार्टी ,  महाज्योती ,  टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल ,  केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल ,  अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  येथे दिली.              सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके-विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  उपमुख्यमंत्री अजित पवार ,  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,  वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ,  खासदार रामदास तडस ,  आमदार सर्व

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - सुमंत भांगे

  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त     विविध कार्यक्रमांचे आयोजन -                                                                                      सुमंत भांगे लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  : राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर     हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम , उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी ,  सर्व स्थानिक स्वराज्य संस्था , सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालये ,  महानगरपालिका व नगरपालिका ,  नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे , असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत.             राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा ,  प्रभात फेऱ्या ,  सभा ,  विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार ,  गौरव ,  आरोग्य

टेंबवली येथील हजरत पीर इस्माईलशा कादरी (र.अ) यांचा ऊर्स 1 व 2 ऑक्टोबर रोजी

टेंबवली येथील हजरत पीर इस्माईलशा कादरी (र.अ) यांचा ऊर्स 1 व 2 ऑक्टोबर रोजी लोकमानस प्रतिनिधी  देवगड -  देवगड तालुक्यातील टेंबवली येथील हजरत पीर इस्माईलशा कादरी (र.अ) यांचा ऊर्स 1 व 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.  टेंबवली येथील सुन्नी जमातूल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्टचे मुराद नाईक यांनी याबाबत माहिती दिली. भाविकांनी या ऊर्स कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नाईक यांनी केले आहे. ऊर्स निमित्त दोन दिवस रात्री आठ ते अकरा वाजेदरम्यान भाविकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी संदल होईल.  दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित इज्तेमामध्ये सुन्नी दावते इस्लामीचे कारी मौलाना रिजवान खान मार्गदर्शन करतील.  

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

इमेज
ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय लोकमानस प्रतिनिधी  मुंबई, दि. २७ : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ )होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.   अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आ

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात मंत्रालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही माहिती दिली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल असे देशपांडे यांनी सांगितले. या मतदारसंघांची मुदत पुढच्या वर्षी जुलै २०२४ ला संपणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी दरवेळी मतदारांची नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांकरिता येत्या ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. हा टप्पा ६ नोव्हेंबरला संपेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतही मतदार नोंदणी केल

सामाजिक कायदे राबविण्याची जबाबदारी सामाजिक संघटनांची - डॉ. नीलम गोऱ्हे

इमेज
सामाजिक कायदे राबविण्याची जबाबदारी सामाजिक संघटनांची -  डॉ. नीलम गोऱ्हे,   गोऱ्हे यांच्या हस्ते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ या अनुभव कथन पुस्तकाचे प्रकाशन लोकमानस प्रतिनिधी वसई : महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्तींनी केलेल्या प्रबोधनामुळेच महाराष्ट्र घडला आहे. जागतिक, वैश्विक, घटनात्मक चौकट समजली की समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडता येते. तसेच सरकारने केलेल्या सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सामाजिक संघटनांची असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.  श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित यांच्या ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ या अनुभव कथन पुस्तकाचे आणि आम्ही काय र चिखुल खावा?  याच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सनराइज बँक्वेट बाभोळा वसई (पश्चिम)येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.   डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, समाजाची मानसिकता महिलांना कमी लेखणारी असते. त्यामुळे महिलांमध्ये धैर्य राहत नाही. मात्र हे धैर्य लोकांशी संवाद साधल्याने येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांन

इक्बाल मेमन यांची मेमन समाजाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड

इमेज
इक्बाल मेमन यांची मेमन समाजाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या अध्यक्षपदी इक्बाल मेमन ऑफिसर यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. मेमन जमातच्या मुंबईत हज हाऊस मध्ये नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व मेमन अधिवेशनात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.  २०२३ ते २०२७ अशा चार वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना केलेल्या समाजोपयोगी कामांवर विश्वास ठेवून समाजाने पुन्हा बिनविरोध निवड केली आहे, त्यामुळे मेमन यांनी सर्वांचे आभार मानले.  मेमन समाजाला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही इक्बाल मेमन यांनी निवडीनंतर व्यक्त केली.  या कार्यक्रमाला माजी खासदार अॅड मजीद मेमन, माजी आमदार सोहेल लोखंडवाला, मौलाना मोईनुद्दीन अश्रफ, निजामुद्दीन राईन, डॉ. अब्दुस समी बुबेरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

राजकारणातील हिरा, आकाशाला गवसणी घालूनही जमीनीवर पाय असलेला सात्विक नेता - सुरेश प्रभू

इमेज
राजकारणातील हिरा,   आकाशाला गवसणी घालूनही जमीनीवर पाय असलेला सात्विक नेता - सुरेश प्रभू ---------------  माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेश प्रभू यांची मालवणमध्ये नुकतीच भेट झाली, त्या भेटीबाबत  डॉ. शरीफ गिरकर यांनी व्यक्त केलेल्या भावना...  :::: आज 20 सप्टेंबर 2023 , आज माझ्या आयुष्यात असा एक सुवर्णक्षण आला ज्याचे मी शब्दांत वर्णन करु शकत नाही.  त्याचे झाले असे,  माझा मुलगा खलील गिरकर पत्रकार आहे,  त्याचे आपले सर्वांचे लाडके नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सुरेशजी प्रभू यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.  खलीलकडून कळले की प्रभू साहेब गणेशोत्सवासाठी त्यांच्या मूळ गावी मालवण मुक्कामी आलेले आहेत.  त्यांच्याशी संपर्क साधून खलीलने त्यांची वेळ घेतली.  त्यानंतर आम्ही सर्व सहकुटुंब त्यांच्या मूळ गावी रवाना झालो. त्यांच्या सूनेने सुहास्य वदनाने आमचे सर्वांचे स्वागत केले.  प्रभू साहेब बाप्पांच्या विसर्जनाला गेले असून ते थोड्याच वेळात येतील तोपर्यंत तुम्ही घरात बसून घ्या,  अशी आग्रहाची विनंती केली.  कोकणातल्या सर्वसाधारण घराप्रमाणे त्यांचे घर, साधेसे मात्र नीटनेटके व घरात प्रसन्न वातावरण

बाप्पा खेतवाडीचा !!बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , खेतवाडी १० वी गल्ली

इमेज
बाप्पा खेतवाडीचा !! बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , खेतवाडी १० वी गल्ली ओमकार स्वरूपा ! अनाथांच्या नाथा !! तुज नमो ! तुज नमो !! तुज नमो !! जनमानसातील सर्वांचे लाडके दैवत म्हणजे आपला गणपती बाप्पा !  त्याचे तेजपुंज विलोभनीय रूप पाहताच भक्त मंडळी तहान भूक विसरतात.  स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या तत्वांना अनुसरून, जनजागृती आणि लोकांची एकजूट होणे हा हेतू मनात बांधुन खेतवाडी १० व्या गल्लीतील दत्ता मुंगसे, राजन पुजारी, दिनानाथ होडावडेकर, शिवाजी साळुंके, निशिकांत तावडे या तरुण मंडळींनी एकत्र येऊन १९५६ साली १० वी खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली त्यांनतर पुढे वसंत आगावणे, हनुमंत कदम, पप्पा आर्ते आदी  कार्यकर्त्यांनी मंडळाचा विस्तार केला.  पूर्वीच्या काळी वर्गणी वगैरे खूप अल्प स्वरूपात गोळा व्हायची. त्यामुळे गल्लीतील लहान मुलेच आपल्यातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून सार्वजनिक उत्सवात नकला, गाणी आणि नाच असे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करत असतं. गणेशोत्सव कालावधीत संध्याकाळी विविध स्पर्धाचे आयोजिन केले जायचे. माझे बाबा गजानन येजरे  गेली ६० वर्षे या मंडळाच

मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणुक ‘जुमला’च :- नाना पटोलेंची टीका

मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणुक ‘जुमला’च :- नाना पटोलेंची टीका,   २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही ;  मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिरास,  महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काही नाही. लोकमानस प्रतिनिधी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल असे दिसत आहे. विधेयकातील तरतुदी पाहता महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काहीही नाही. महिला आरक्षण कायदा झाला तरी त्याची अंमलबजावणी २०२४ च्या निवडणुकीसाठी होणार नसून देशातील कोट्यवधी महिलांचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे ,  असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना नाना पटोले म्हणाले की ,  महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजुर झाले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता दिसत नाही. लोकसभा व विधानसभेती

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर, महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 % आरक्षण मिळणार

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर,  महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 % आरक्षण मिळणार  लोकमानस प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारतर्फे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केले. पंतप्रधानांनी या विधेयकाचे नाव नारी शक्ति बंधन अधिनियम असल्याचे लोकसभेत जाहीर केले.  नवीन संसद भवनात आज कामकाजाचा पहिला दिवस होता.  पहिल्याच दिवशी महिला आरक्षणाचे पहिले विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. केंद्र सरकारने 18 सप्टेंबर पासून पाच दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.  या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे विधेयक मांडण्यात आले.  या अधिवेशनात हे महत्त्वपूर्ण विधेयक मंजर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले तरी 2024 च्या  लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही.  या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागेल.या विधेयकाची मुदत सध्या पंधरा वर्षे ठेवण्यात आली आहे त्यानंतर या विधेयकाची मुदत संसदेला वाढवून घ्यावी लागेल. त्यासाठी नव्याने विधेयक मांडून ते मंजूर करुन घ्यावे लागेल. केंद्रीय कँ

पुण्यात ८ ऑक्टोबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन

पुण्यात ८ ऑक्टोबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन,   महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील  निवड पात्र खेळाडू सहभागी होणार लोकमानस -प्रतिनिधी मुंबई -  कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, बाणेर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी दिली आहे.      सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाड २४ व २५ डिसेंबर २०२३ रोजी  तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद,२०२३ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आप आपापल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर  खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करावी असे आवाहन राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना  यामाध्यमातून केले आहे.      ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन,

२२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषदेचे आयोजन

इमेज
२२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषदेचे आयोजन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  २२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  मौलाना आझाद विचार मंचच्या पुढाकाराने मुंबई येथे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. जलालुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली‌.  या बैठकीत २२ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषद आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी बोलताना माजी खा. हुसेन दलवाई म्हणाले की, सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे . गरीब मराठा समाजास आरक्षण मिळावे ही माझी फार पूर्वीपासूनच भूमिका आहे, मराठा समाजावर आरक्षण मिळणे योग्य आहे,पण त्यासोबतच मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये आरक्षण वैध ठरविले आहे.त्यामुळे मुस्लिमांना ५% आरक्षण मिळणे सामाजिक न्यायानुसार योग्य आहे, पण दुर्दैवाने सर्वच पक्षातील नेते याबाबतीत चकार शब्द काढायला तयार नाहीत याची खंत वाटते. तसेच मुस्लीम समाजही शिक्षण,आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर संघटित होत नाही याब

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय माझगाव कोर्ट इमारतीत स्थलांतरीत

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  कार्यालय  माझगाव कोर्ट इमारतीत स्थलांतरीत लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यालय माझगाव कोर्ट इमारतीत सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत हे कार्यालय नगर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या इमारतीत कार्यरत होते ते शनिवारपासून स्थलांतरीत करण्यात आले आहे.   मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज शनिवारी मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती ए. एस. गडकरी,  न्यायमूर्ती  एन. जे. जमादार व  न्यायमूर्ती  एन. के. गोखले, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबईचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रम्हण्यम, मुंबईचे मुख्य महानगर दंडाधिकारी एम. आर. ए. शेख,  प्रशिक्षित मध्यस्थ वकिल संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले.  या कार्यक्रमाच्यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी अर्पण करून फित कापण्यात आली. याप्रसंगी  उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तीला व्हावा अशी अपेक्षा  मान्यवरांनी व्यक्त केली व प्राधिकरणाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  सदर कार्यालयामध्ये मध्यस्थी केंद्र, लोकअभिरक्षक कार्या

जलतरण तलावाची दरवर्षी होणारी दहा टक्के दरवाढ बंद करा,पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी

इमेज
जलतरण तलावाची दरवर्षी होणारी दहा टक्के दरवाढ बंद करा, पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - जलतरण तलावाच्या शुल्कात दरवर्षी दहा टक्के वाढ केली जात आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी स्वीमिंग पूल स्पोर्टस असोसिएशनचे सदस्य मुराद नाईक व  जितेंद्र सिंग यांनी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.  महात्मा गांधी स्मारक जलतरण तलावाच्या शुल्कात दरवर्षी दहा टक्क्यांनी दरवाढ केली जाते. महात्मा गांधी स्मारक जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी बांधण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या दहा टक्के अन्याय्य दरवाढीमुळे याचा लाभ घेणे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चालले आहे. एकीकडे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया व सरकारी माहितीनुसार दरवर्षी महागाई दरात पाच ते सहा टक्के वाढ होत असताना जलतरण तलावाच्या शुल्कात होणारी दहा टक्के मनमानी पध्दतीची आहे, त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी मुराद नाईक व जि

केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध तीव्र लढा देणार - हरभजन सिंग सिद्धू, स्टील उद्योगातील कामगारांचे अधिवेशन संपन्न

इमेज
केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध तीव्र लढा देणार - हरभजन सिंग सिद्धू,   कोलकाता जवळील दुर्गापूर मध्ये स्टील उद्योगातील कामगारांचे अधिवेशन संपन्न प्रतिनिधी  केंद्र सरकारच्या मालक धार्जिण्या  शेतकरी व किसान धोरणाविरुद्ध देशभर तीव्र लढा दिला जाईल, असा स्पष्ट इशारा हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांनी जाहीर सभेत दिला. कोलकत्ता येथील दुर्गापुर शहरांमध्ये स्टील अँड मेटल इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्टील उद्योगातील कामगारांचे अधिवेशन  हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली  दुर्गापूर येथील नेताजी भवन सभागृहात संपन्न झाले. अधिवेशन प्रसंगी हरभजन सिंग सिद्धू यांच्या हस्ते झेंडावंदन करून,  शहीद झालेल्या कामगारांना मान्यवर कामगार नेत्यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले.  हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, देश धोक्यात आहे. कामगार कायदे बदलल्यामुळे कामगार संघटनांसमोर अनेक आव्हाने आहेत. मालकधार्जिणे कायदे बनव

मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा,मुस्लीम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी- हुसेन दलवाई

मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा, मुस्लीम समाजालाही आरक्षण देण्याची  मागणी-  हुसेन दलवाई लोकमानस प्रतिनिधी मुंबई :  :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचे स्वागतच आहे. सबंध महाराष्ट्रात यासाठी आंदोलन उभारले गेले आहे.  मी व मा. केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले आम्ही  मिळून गेली ३० वर्षापासून मराठा समाजातील गरिबांना शिक्षण व नोकरीची संधी मिळावी यासाठी आरक्षणाची मागणी करीत असल्याचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी आठवण करून दिली आहे. आज त्याला आंदोलनात्मक स्वरूप आले आहे. मराठा समाज हा दलित आदिवासी व ओबीसी सारखा मागासलेला नसला तरीही त्यांच्यामध्ये शिक्षण, बेकारी, उद्योगहीनता मोठ्या प्रमाणात आढळून येते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारे हात न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार केला जावा अशी भूमिका माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधी सर्व विचार करीत असताना आज सबंध देशात मुस्लीम समाज शिक्षण, नोकरी व उद्योग याच्यामध्ये दलित व आदिवासी सामाजापेक्षाही मागे राहिला आहे, ही वस्तुस्थिती सच्चर कमिटीने लक्षात आणून दिली आहे. इतकेच काय दारिद्रयर

माजी आमदार अतुल शाह यांनी बनवलेले चांद्रयान गीत मराठी डी.डी.सह्याद्री वाहिनीवर

इमेज
माजी आमदार अतुल शाह यांनी बनवलेले चांद्रयान गीत मराठी डी.डी.सह्याद्री वाहिनीवर   लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  भाजपचे माजी आमदार अतुल शाह यांनी बनवलेले चांद्रयान गीत मराठी डी.डी.सह्याद्री वाहिनीवर १३ सप्टेंबर  रोजी सकाळी १०.५४ वाजता व दुपारी ३.५५ वाजता दाखवले जाणार आहे.   अतुल शाह ह्यांनी चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेवर जे गीत बनविले होते त्याची दखल दूरदर्शन वरील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी डी डी सह्याद्री वाहिनीने घेऊन त्यावर बुधवारी १३ सप्टेंबर २०२३  रोजी  सकाळी १०.५४ वा. व दुपारी ३.५५ वा. जय हो- जय भारत जय हो" हे गीत  दिलेल्या वेळी दाखविण्यात येणार आहे.  शाह यांनी हे गीत हिंदी आणि मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेत बनवेले आहे. 

रिक्षा टॅक्सी, स्कुल बस, खाजगी वाहने, ट्रेलर, ट्रक आदी वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करा हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इमेज
रिक्षा टॅक्सी, स्कुल बस, खाजगी वाहने, ट्रेलर, ट्रक आदी वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करा हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  - रिक्षा-टॅक्सी, स्कुल बस, खाजगी वाहने, ट्रेलर, ट्रक इ. वाहनावर ज्याप्रकारे ऑनलाईन कारवाई करून दंड आकारले जात आहेत व दंड न भरल्यास त्या वाहनावर जप्ती आणली जात आहे.  या प्रकारांमुळे वाहन चालकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे या वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करा   अशी मागणी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष  हाजी अरफात शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  रिक्षा टॅक्सी चालक हा दिवसभरात जेमतेम ४०० ते ५०० रुपये कमावतो व त्यावर तो घर चालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात जर वाहन १ इंच जरी झेब्रा क्रॉसिंग च्या पुढे गेले अथवा सिग्नल चुकून तोडला की लगेच ट्रॅफिक पोलीस अधिकारी तत्काळ त्या वाहनांचा फोटो काढून त्यावर ऑनलाईन दंडाची कारवाई करतात तो दंड जवळपास ५०० ते १००० रु. इतका असतो. मुळात  कमी उत्पन्न

मुंब्रा कौसा मध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन, दोन लाख रुपयांची बक्षिसे, पहिल्या सत्तर जणांना एक हजार रुपयांचे बक्षिस मर्झिया पठाण यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन

इमेज
 मुंब्रा कौसा मध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन, दोन लाख रुपयांची बक्षिसे, पहिल्या सत्तर जणांना एक हजार रुपयांचे बक्षिस  मर्झिया पठाण यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन  प्रतिनिधी - मुंब्रा कौसा परिसरातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्वसामान्यांना आपल्या चित्रकलेचे सादरीकरण करण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या स्पर्धा होतील. मुंब्रा कौसामधील उदयोन्मुख नेतृत्व असलेल्या मर्झिया शानू पठाण यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंब्रा कौसा सुपर ७० असे या स्पर्धेचे नाव आहे. यामध्ये दोन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत., स्पर्धेतील पहिल्या ७० जणांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. २ ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तन्वर नगर येथील मैदानात ही स्पर्धा होईल. तर, बक्षिस वितरण दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबरला त्याच मैदानात सायंकाळी सात ते दहा वाजण्याच्या सुमारास होईल. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत २७ सप्टेंबर पर्यंत आहे.   अ गट- गांधी जयंती विशेष, ब गट -इयत्ता पहिली ते चौथी, क गट-

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंतीआंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमानस प्रतिनिधी मुंबई दिनांक ११:  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत, आणि त्यादृष्टीने ठोस पाउले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा समाजास आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.         सर्व पक्षीय बैठकीत सर्वांचे आभार मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काहीतरी थातुरमातुर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे इतर समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलं

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी,मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव,नाना पटोले यांचा आरोप

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव, नाना पटोले यांचा आरोप  मुंबई मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष ,  संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे ,  असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.   यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की ,  कोरोना संकटावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही ,  नोटबंदीच्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही ,  मणिपूरच्या मुद्यावरही विशेष अधिवेशन बोलावले नाही पण आपल्या लहरी व मनमानीपणाने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे ,  देशाची आर्थिक राजधानी आहे ,  महाराष्ट्राची ,  देशाची शान आहे आणि हेच भाजपाला खुपत असल्याने मुंबईतील

लोकन्यायालयात 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली

इमेज
लोकन्यायालयात 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  लोकन्यायालयात 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली  काढण्यात आली. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांचे मूल्य 792  कोटी 44 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.    शनिवारा  मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष अनिल सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नगर दिवाणी व सत्र न्यायालय, महानगरदंडाधिकारी  न्यायालय, राज्य ग्राहक आयोग, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी व एमएसीटी, मुंबई येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते.  सदर लोक न्यायालयात 88 पॅनल नेमण्यात आली होती ज्यामध्ये 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य रुपये 792  कोटी 44 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी येथील न्यायालयात एकूण 8 हजार 237 प्रलंबित खटले निकाली काढ

एकाच इमारतीत ४३ घरातील वीजचोरी पकडण्यात यश, टोरंट पॉवरच्या दक्षता पथकाची कारवाई

एकाच इमारतीत ४३ घरातील वीजचोरी पकडण्यात यश,   टोरंट पॉवरच्या दक्षता पथकाची कारवाई ठाणे -  प्रतिनिधी- टोरंट पॉवरच्या दक्षता पथकाने घातलेल्या धाडीत मुंब्रा अमृत नगर येथील एका इमारतीत वीज चोरीच्या ४३ केसेस पकडल्या असून या प्रकरणी ८ जणांविरूध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अमृत नगर येथील ‘बाग ए ख्वाजा’ या इमारतीत ही वीज चोरी पकडण्यात आली असून तळमजला ते सहा मजल्यांची ही इमारत आहे. येथील ४३ घरांमध्ये ८ जणांच्या नावाने वीज मीटर दाखवण्यात आले होते. सदर ठिकाणी पूर्वी ‘नयना सदन’ नावाने इमारत होती. त्यावेळी २० वीज मीटर त्या इमारतीत होते. सदर बिल्डींग नंतर तोडण्यात आली मात्र मीटर वीज कंपनीकडे जमा करण्यात आले नव्हते. विकासक सय्यद शाबी अहमदवली यांनी नवीन इमारत बांधताना नयना सदन हे आधीचे इमारतीचे नाव बदलून ‘बाग ए ख्वाजा’ असे नाव करून नवीन वीज मीटरसाठी अर्ज केलेला दाखवण्यात आला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी आधीचे जुने मीटर लावून टोरंट पॉवरच्या वाहिनीतून थेट जोडणी करून वीज चोरी सुरू होती. तेथे ८ जणांच्या नावावर मीटर दाखवून चोरीची वीज ४३ घऱांमध्ये पुरवली गेली असल्याचे दक्षता पथकाच्य

भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच; त्यांच्यावर कारवाई नको - राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका

आरक्षणविषय संवेदनशील, मात्र प्रश्न चर्चेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील - राधाकृष्ण विखे पाटील भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच; त्यांच्यावर कारवाई नको - राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका लोकमानस प्रतिनिधी  सोलापूर  :  श्री देव खंडोबाराया यांच्या पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. तेव्हा भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. आरक्षण हा विषय संवेदनशील असून प्रश्न चर्चेने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.            राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो, याही पुढे जाऊन सांगतो आपल्या मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर जाऊन आपल्या समस्या, आपला आवाज तिथे प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता

ऊर्दू सवेरा फाऊंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

इमेज
ऊर्दू सवेरा फाऊंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान प्रतिनिधी ठाणे - शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऊर्दू सवेरा फाऊंडेशनने उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा व शाळांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूर मोहम्मद अंबर होते.  यावेळी  इकबाल अन्सारी, सय्यद खालिद, कुलसूम अन्सारी, रिजवाना सय्यद, अब्दुल करीम आणि अब्दुल्ला अल्वी या 6 शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.   तर, पटेल हायस्कूल, टीएमसी उर्दू स्कूल क्रमांक 11- मुंब्रा, अब्दुल्ला पटेल हायस्कूल, सेंट्रल पब्लिक हायस्कूल, एक्सलन्स क्लासेस, उम्मीद स्कूल या शाळांना चांगले काम करणाऱ्या शाळा, संस्था म्हणून गौरवण्यात आले.  यावेळी जियाऊर रहमान अन्सारी,  अब्दुल अजीज अन्सारी, मोहम्मद रफी अन्सारी, मौलाना महफुजुर रहमान अलीमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर नूर मोहम्मद अंबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इस्त्राईल खान व सय्यद जाहिद अली यांनी केले.  भिवंडी रईस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ज

भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची फेरनिवड

इमेज
भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची फेरनिवड मुंबई - प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शेख यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी काम केले आहे.  नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या हाजी अरफात शेख वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कार्यरत राहतात.  शेख यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माधव भंडारी व इतर भाजप नेते उपस्थित होते.  शेख यांच्या फेरनियुक्तीचे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत वाहतूकदारांमधून स्वागत करण्यात येत आहे.   वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून कार्यरत राहण्याची ग्वाही शेख यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व  भाजप श्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबाबत शेख यांनी आभार व्यक्त केले.  

इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही, 50 टक्के सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज, - शरद पवार यांचा घणाघात

 इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही, 50 टक्के सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज, -   शरद पवार  यांचा घणाघात  मुंबई - देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा 50 टक्के होऊन वाढवून 65 टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो परंतु तसे केंद्रातले भाजप सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद  पवार यांनी केंद्र सरकारवर केला. जळगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला नेमका कोणाच्या आदेशावरून झाला हे सरकारने स्पष्ट करावे,  अशी ही मागणी पवार यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप एका राजकीय सभेतून केले होते व त्या आरोपासंदर्भात केंद्रीय स्तरावरून चौकशीचे आदेश हे पंतप्रधानांनी का दिले नाही अशी विचारणा पवारांनी केली.       भारतीय राज्यघटनेतून इंडिया हे नाव वगळण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नाबाबत पवार साहेबांनी सदर नाव कोणीही बदलू शकणार नाही आणि इंडिया या नावावर केंद्र सरकारला एवढा आक्षेप का याचे उत्तर भाजप स

मीरा जोशीसाठी मंगळवार महत्त्वाचा दिवस, 'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' गाणे मंगळवारी रिलीज होणार व झी मराठीवर 'दार उघड बये दार उघड' मालिकेत 'चंपा' ची एन्ट्री होणार

इमेज
मीरा जोशीसाठी मंगळवार महत्त्वाचा दिवस,  'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' गाणे मंगळवारी रिलीज होणार व झी मराठीवर 'दार उघड बये दार उघड' मालिकेत 'चंपा' ची एन्ट्री होणार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  अभिनेत्री, नृत्यांगणा मीरा जोशीसाठी मंगळवार महत्त्वाचा दिवस ठरला आहे. मीरा जोशीवर चित्रित झालेले 'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' हे गाणे मंगळवारी रिलीज होत आहे.  तसेच झी मराठीवर 'दार उघड बये दार उघड' मालिकेत 'चंपा' च्या भूमिकेतून मीराची एन्ट्री होणार आहे.  'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' या गाण्याचे चित्रीकरण उरण येथील समुद्रात  करण्यात आले आहे.  गाण्याचे चित्रीकरण होत असताना मीरा  जोशी, तिचा हिरो व इतर जण शुटिंग दरम्यान पाण्यात पडले मात्र सुदैवाने ते वाचले, अशी आठवण मीरा जोशी यांनी सांगितली. 'कचकच कांदा' फेम गायिका राधा खुडे यांनी हे गाणे गायले आहे. टिप्स मराठी तर्फे हे गाणे तयार करण्यात आले आहे  या गाण्याच्या प्रमोशनसाठी मीरा जोशी ने सेव्ह द डेट असा सोशल मीडिया वर संदेश दिला होता मात्र मीराच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.  झी

दहिहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा

दहिहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा,   राज्यभरातील आगमन, विसर्जन मार्गांची डागडुजी तातडीने करावी, सण उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  मुंबई, दि. ४: आगामी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.  सह्याद्री अतिथीगृह येथे दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्तच्या आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचि

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंब्रा येथून मोफत बस सुविधा

इमेज
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंब्रा येथून मोफत बस सुविधा प्रतिनिधी मुंब्रा- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंब्रा येथून मोफत बस सेवा पुरवण्यात येत आहे.  ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे यांच्या पुढाकाराने  गणेशभक्तांसाठी ही मोफत सुविधा पुरवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे. याबाबत माहिती देताना राजन किणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गणेशभक्तांसाठी ही सेवा पुरवण्याची सूचना केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा पुरवण्यात येणार आहे.   मुंब्रा कौसा येथून कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमान्यांना या उपक्रमाचा लाभ होईल. चिपळूण, खेड, लांजा, सावंतवाडी, वैभववाडी,राजापूर,कणकवली, सावर्डे, कुडाळ, महाड, माणगाव अशा विविध ठिकाणी या बसद्वारे जाता येईल. ज्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन राजन किणे, अनिता किणे,  मोरेश्वर किणे, करण किणे  यांच्यातर्फे करण्यात आले आहे.  संपर्क -  विन