२२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषदेचे आयोजन

२२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषदेचे आयोजन
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 

२२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 
मौलाना आझाद विचार मंचच्या पुढाकाराने मुंबई येथे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. जलालुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली‌. 
या बैठकीत २२ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषद आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी बोलताना माजी खा. हुसेन दलवाई म्हणाले की, सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे . गरीब मराठा समाजास आरक्षण मिळावे ही माझी फार पूर्वीपासूनच भूमिका आहे, मराठा समाजावर आरक्षण मिळणे योग्य आहे,पण त्यासोबतच मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये आरक्षण वैध ठरविले आहे.त्यामुळे मुस्लिमांना ५% आरक्षण मिळणे सामाजिक न्यायानुसार योग्य आहे, पण दुर्दैवाने सर्वच पक्षातील नेते याबाबतीत चकार शब्द काढायला तयार नाहीत याची खंत वाटते. तसेच मुस्लीम समाजही शिक्षण,आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर संघटित होत नाही याबाबतही समाजामध्ये प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.त्यासाठी मी राज्यभर फिरून समाजाला संघटीत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते ॲड.जलालूद्दीन म्हणाले की, सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच मुस्लिमांनी मराठा समाजाचे आदर्श घ्यावे व सर्व भेदा-भेद विसरुन एकतेचे प्रदर्शन घडवावे तरच आपल्याला आरक्षण मिळू शकेल. त्यासाठी २२ ऑक्टोबरला मुंबईत मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषद आयोजित केली जाईल, या परिषदेत प्रचंड संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
     मौलाना आझाद विचार मंच चे प्रदेश सरचिटणीस हसीब नदाफ यावेळी बोलताना म्हणाले की,सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा कमिशन व डॉ. मेहमूदुर्रहमान  अभ्यास गटाने मुस्लिम समाजाच्या अधोगतीचा आढावा सप्रमाण सिद्ध केला आहे आणि मुस्लिमांना सर्वांगीण विकासासाठी आरक्षण व वेगळ्या तरतुदीची आवश्यकता आहे असे नमूद केले आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे,पण त्यासाठी एकत्रित आवाज बुलंद करावा लागेल.   

  या बैठकीत प्रकाश सोनवणे, मधु मोहिते,मराठा खान, शबाना खान, ऐनुल अत्तार, सुहेल सुभेदार, राशीद मन्सूरी आदींनी आपले विचार मांडले.
    १९ जुलै २०१४  रोजी मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला दिलेले ५% आरक्षण अबाधित ठेवा,ओबीसींचे  आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजास आरक्षण द्या, सर्व जाती-जमातींची जात निहाय जनगणना करा,अल्पसंख्याक समाजास त्यांच्या लोकसंख्ये प्रमाणे १५% निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा, जिल्हा पातळीवर सर्व सोयींनी युक्त मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची सोय करा, पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करा,मुस्लिम समाजातील ओबीसी,भटके- विमुक्त,आदिवासी प्रवर्गातील जमातींना जात पडताळणीची प्रक्रिया सुलभ करा इत्यादी मागण्यावर या बैठकीत चर्चा होऊन परिषदेमध्ये ठराव मांडण्याचे ठरवण्यात आले.
   या परिषदेपूर्वी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन समाजाचे या प्रश्नावर प्रबोधन करण्याचे ठरवण्यात आले.यावेळी शमशाद तुर्की यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीस राज्यभरातून सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही