भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची फेरनिवड

भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची फेरनिवड
मुंबई - प्रतिनिधी 
भारतीय जनता पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शेख यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी काम केले आहे. 
नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या हाजी अरफात शेख वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कार्यरत राहतात.  शेख यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलच्या अध्यक्षदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माधव भंडारी व इतर भाजप नेते उपस्थित होते. 
शेख यांच्या फेरनियुक्तीचे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत वाहतूकदारांमधून स्वागत करण्यात येत आहे.  
वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून कार्यरत राहण्याची ग्वाही शेख यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व 
भाजप श्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबाबत शेख यांनी आभार व्यक्त केले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही