जलतरण तलावाची दरवर्षी होणारी दहा टक्के दरवाढ बंद करा,पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी

जलतरण तलावाची दरवर्षी होणारी दहा टक्के दरवाढ बंद करा,
पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - जलतरण तलावाच्या शुल्कात दरवर्षी दहा टक्के वाढ केली जात आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी स्वीमिंग पूल स्पोर्टस असोसिएशनचे सदस्य मुराद नाईक व  जितेंद्र सिंग यांनी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. 
महात्मा गांधी स्मारक जलतरण तलावाच्या शुल्कात दरवर्षी दहा टक्क्यांनी दरवाढ केली जाते. महात्मा गांधी स्मारक जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी बांधण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या दहा टक्के अन्याय्य दरवाढीमुळे याचा लाभ घेणे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चालले आहे. एकीकडे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया व सरकारी माहितीनुसार दरवर्षी महागाई दरात पाच ते सहा टक्के वाढ होत असताना जलतरण तलावाच्या शुल्कात होणारी दहा टक्के मनमानी पध्दतीची आहे, त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी मुराद नाईक व जितेंद्र सिंग यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही