मुंब्रा कौसा मध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन, दोन लाख रुपयांची बक्षिसे, पहिल्या सत्तर जणांना एक हजार रुपयांचे बक्षिस मर्झिया पठाण यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन

 मुंब्रा कौसा मध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन,

दोन लाख रुपयांची बक्षिसे, पहिल्या सत्तर जणांना एक हजार रुपयांचे बक्षिस

 मर्झिया पठाण यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन 

प्रतिनिधी -

मुंब्रा कौसा परिसरातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्वसामान्यांना आपल्या चित्रकलेचे सादरीकरण करण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या स्पर्धा होतील. मुंब्रा कौसामधील उदयोन्मुख नेतृत्व असलेल्या मर्झिया शानू पठाण यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



मुंब्रा कौसा सुपर ७० असे या स्पर्धेचे नाव आहे. यामध्ये दोन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत., स्पर्धेतील पहिल्या ७० जणांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.

२ ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तन्वर नगर येथील मैदानात ही स्पर्धा होईल. तर, बक्षिस वितरण दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबरला त्याच मैदानात सायंकाळी सात ते दहा वाजण्याच्या सुमारास होईल. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत २७ सप्टेंबर पर्यंत आहे.

 

अ गट- गांधी जयंती विशेष, ब गट -इयत्ता पहिली ते चौथी, क गट- इयत्ता पाचवी ते सातवी, ड गट - इयत्ता आठवी ते दहावी, ई गट - सर्वांसाठी खुला,फ गट - इस्लामिक कॅलिग्राफी, ब गटासाठी पहिले बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस दोन हजार रुपये, ब गट वगळता इतर सर्व गटासाठी पहिले बक्षिस अकरा हजार रुपये, दुसरे बक्षिस सात हजार रुपये, तिसरे बक्षिस पाच हजार रुपये, सुपर ७० मध्ये निवडण्यात आलेल्या सर्वांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षिस देण्यात येईल, अशी माहिती मर्झिया पठाण यांनी दिली. मुंब्रा कौसा मधील बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या व सर्वसामान्यांच्या सुप्त कलेला समोर आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही