ऊर्दू सवेरा फाऊंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

ऊर्दू सवेरा फाऊंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान
प्रतिनिधी
ठाणे - शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऊर्दू सवेरा फाऊंडेशनने उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा व शाळांचा सन्मान केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूर मोहम्मद अंबर होते. 
यावेळी  इकबाल अन्सारी, सय्यद खालिद, कुलसूम अन्सारी, रिजवाना सय्यद, अब्दुल करीम आणि अब्दुल्ला अल्वी या 6 शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.  
तर, पटेल हायस्कूल, टीएमसी उर्दू स्कूल क्रमांक 11- मुंब्रा, अब्दुल्ला पटेल हायस्कूल, सेंट्रल पब्लिक हायस्कूल, एक्सलन्स क्लासेस, उम्मीद स्कूल या शाळांना चांगले काम करणाऱ्या शाळा, संस्था म्हणून गौरवण्यात आले. 
यावेळी जियाऊर रहमान अन्सारी,  अब्दुल अजीज अन्सारी, मोहम्मद रफी अन्सारी, मौलाना महफुजुर रहमान अलीमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर नूर मोहम्मद अंबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इस्त्राईल खान व सय्यद जाहिद अली यांनी केले.
 भिवंडी रईस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जियाऊर रहमान अन्सारी यांनी मुख्य भाषणात म्हणाले, शिक्षकाकडे  समाज घडवणारे या नात्याने पाहिले जाते त्यामुळे शिक्षकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे. केवळ पाट्या टाकण्याचे काम करु नये.  शिक्षकी पेशाकडे केवळ नोकरी या दृष्ट्रीने न पाहता एक व्रत या नजरेने पाहण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे ते म्हणाले. शिक्षकाने बहुश्रुत असणे गरजेचे आहे त्यासाठी शिक्षकांनी किमान दररोज एक वर्तमानपत्र, महिन्यात एक नियतकालिक व वर्षात किमान तीन पुस्तके वाचायलाच हवीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते त्याची जाणिव करुन घेणे व त्याप्रमाणे वागणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  विचार आणि दूरदृष्टीशिवाय शिक्षक हा शिक्षक होऊ शकतो, परंतु तो राष्ट्राचा शिल्पकार होऊ शकत नाही,  असे ते म्हणाले.  
माजी उपप्राचार्य अब्दुल अजीज अन्सारी म्हणाले की, अल्लाहचे पैगंबर मुहम्मद साहब हे मानवजातीचे महान गुरू आहेत आणि आम्ही शिक्षक त्यांचे उपासक आहोत.

भिवंडीतील शिक्षणतज्ञ मोहम्मद रफी अन्सारी यांनी एका विद्यार्थ्याचे शिक्षकाला पत्र या स्वरुपात सद्यस्थितीवर परखड भाष्य केले व शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा समोर ठेवल्या.
मौलाना महफुजुर रहमान अलीमी म्हणाले की, इस्लाममधील सर्व कर्तव्ये आणि आदेशांमध्ये, ज्याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे ते 'ज्ञान' आहे, जे प्राप्त करणे कर्तव्य घोषित केले आहे. आणि प्रत्येक ज्ञान जे मानवतेसाठी फायदेशीर आहे त्याला योग्य ज्ञान म्हणतात. अशा परिस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा  परिणामकारक आहे असे ते म्हणाले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी शिक्षक नूर मोहम्मद अंबर यांनी सांगितले,शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे त्यामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल.  
ऊर्दू सवेराचे अध्यक्ष अन्वारुल हक खान यांनी  या संस्थेच्या उभारणीची उद्दिष्टे व हेतूंची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमालुद्दीन खान, अन्वर शेख, अब्दुसमद सय्यद, इम्रान फरीद, इम्तियाज मन्सूरी, इब्राहिम शेख, परवेज खान, अशरफ खान, मोहसीना शहा, रिजवाना मँडम व अॅड खलील गिरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुंब्रा कौसा भिवंडी  परिसरातील शिक्षक,  शाळांचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही