गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंब्रा येथून मोफत बस सुविधा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंब्रा येथून मोफत बस सुविधा
प्रतिनिधी
मुंब्रा- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंब्रा येथून मोफत बस सेवा पुरवण्यात येत आहे.  ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे यांच्या पुढाकाराने  गणेशभक्तांसाठी ही मोफत सुविधा पुरवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
याबाबत माहिती देताना राजन किणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गणेशभक्तांसाठी ही सेवा पुरवण्याची सूचना केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा पुरवण्यात येणार आहे.  
मुंब्रा कौसा येथून कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमान्यांना या उपक्रमाचा लाभ होईल. चिपळूण, खेड, लांजा, सावंतवाडी, वैभववाडी,राजापूर,कणकवली, सावर्डे, कुडाळ, महाड, माणगाव अशा विविध ठिकाणी या बसद्वारे जाता येईल.
ज्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन राजन
किणे, अनिता किणे,  मोरेश्वर किणे, करण किणे 
यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
 संपर्क - 
विनोद पुकाळे: 8689850068
 राज शिंदे: 8291663481 
योगेश माटल : 9967969452

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही