मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा,मुस्लीम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी- हुसेन दलवाई

मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा,
मुस्लीम समाजालाही आरक्षण देण्याची  मागणी-  हुसेन दलवाई
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई :  :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचे स्वागतच आहे. सबंध महाराष्ट्रात यासाठी आंदोलन उभारले गेले आहे.  मी व मा. केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले आम्ही  मिळून गेली ३० वर्षापासून मराठा समाजातील गरिबांना शिक्षण व नोकरीची संधी मिळावी यासाठी आरक्षणाची मागणी करीत असल्याचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी आठवण करून दिली आहे. आज त्याला आंदोलनात्मक स्वरूप आले आहे. मराठा समाज हा दलित आदिवासी व ओबीसी सारखा मागासलेला नसला तरीही त्यांच्यामध्ये शिक्षण, बेकारी, उद्योगहीनता मोठ्या प्रमाणात आढळून येते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारे हात न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार केला जावा अशी भूमिका माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी सर्व विचार करीत असताना आज सबंध देशात मुस्लीम समाज शिक्षण, नोकरी व उद्योग याच्यामध्ये दलित व आदिवासी सामाजापेक्षाही मागे राहिला आहे, ही वस्तुस्थिती सच्चर कमिटीने लक्षात आणून दिली आहे. इतकेच काय दारिद्रयरेषेखालील प्रमाणही मुस्लीम समाजात मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात घेवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करताना मुस्लीम समाजाला ५% आरक्षण देण्याचा सरकारने व सर्वच राजकीय पक्षांनी मिळून निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही