जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - सुमंत भांगे

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन -                                                                                  सुमंत भांगे


लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई : राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर  हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारीसर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयेमहानगरपालिका व नगरपालिकानगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत.

            राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्राप्रभात फेऱ्यासभाविशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कारगौरवआरोग्य शिबीरचर्चासत्रपरिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहितीवृध्दांचे हक्कज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव भांगे यांनी सांगितले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही