टेंबवली येथील हजरत पीर इस्माईलशा कादरी (र.अ) यांचा ऊर्स 1 व 2 ऑक्टोबर रोजी

टेंबवली येथील हजरत पीर इस्माईलशा कादरी (र.अ) यांचा ऊर्स 1 व 2 ऑक्टोबर रोजी
लोकमानस प्रतिनिधी 
देवगड - 
देवगड तालुक्यातील टेंबवली येथील हजरत पीर इस्माईलशा कादरी (र.अ) यांचा ऊर्स 1 व 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. 
टेंबवली येथील सुन्नी जमातूल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्टचे मुराद नाईक यांनी याबाबत माहिती दिली. भाविकांनी या ऊर्स कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नाईक यांनी केले आहे. ऊर्स निमित्त दोन दिवस रात्री आठ ते अकरा वाजेदरम्यान भाविकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. 

रविवारी संदल होईल.  दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित इज्तेमामध्ये सुन्नी दावते इस्लामीचे कारी मौलाना रिजवान खान मार्गदर्शन करतील.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब