मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय माझगाव कोर्ट इमारतीत स्थलांतरीत

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे 
कार्यालय  माझगाव कोर्ट इमारतीत स्थलांतरीत
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन
कार्यालय माझगाव कोर्ट इमारतीत सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत हे कार्यालय नगर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या इमारतीत कार्यरत होते ते शनिवारपासून स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

 मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज शनिवारी मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती ए. एस. गडकरी,  न्यायमूर्ती  एन. जे. जमादार व  न्यायमूर्ती  एन. के. गोखले, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबईचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रम्हण्यम, मुंबईचे मुख्य महानगर दंडाधिकारी एम. आर. ए. शेख,  प्रशिक्षित मध्यस्थ वकिल संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी अर्पण करून फित कापण्यात आली. याप्रसंगी  उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तीला व्हावा अशी अपेक्षा 
मान्यवरांनी व्यक्त केली व प्राधिकरणाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यालयामध्ये मध्यस्थी केंद्र, लोकअभिरक्षक कार्यालय प्राधिकरणाचे कामकाज हे यापुढे माझगांव येथील नूतन इमारतीच्या १३ व्या मजल्यावर सुरु झाले आहे अशी माहिती मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव अनंत देशमुख यांनी दिली.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई हे सदैव दुःखी, कष्टी व पिडीत व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर राहिल अशी ग्वाही मुंबईच्या नगर. दिवाणी व सत्र न्यायालययाचे प्रधान न्यायाधीश तथा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष 
 अनिल सुब्रमण्यम यांनी दिली.

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा नवा पत्ता - १३ वा मजला, माझगांव इमारत, सरदार बलवंत सिंग भोडी मार्ग,  माझगाव मुंबई ४०० ०१३

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही