लोकन्यायालयात 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली

लोकन्यायालयात 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
लोकन्यायालयात 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली  काढण्यात आली. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांचे मूल्य 792  कोटी 44 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.  
 शनिवारा  मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष अनिल सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नगर दिवाणी व सत्र न्यायालय, महानगरदंडाधिकारी  न्यायालय, राज्य ग्राहक आयोग, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी व एमएसीटी, मुंबई येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते. 

सदर लोक न्यायालयात 88 पॅनल नेमण्यात आली होती ज्यामध्ये 13 हजार 275 प्रलंबित प्रकरणे व 1 हजार 464 दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य रुपये 792  कोटी 44 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी येथील न्यायालयात एकूण 8 हजार 237 प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. 

यावेळी मान्यवरांसमक्ष लोक अदालत व मध्यस्थी या विषयावर के. जी. शाह विधि महविद्यालयाच्या विद्यार्थिनीं कडून पथ नाट्य सादर करण्यात आले. सदर लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण चे सचिव अनंत देशमुख  व न्यायालयातील कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही