बाप्पा खेतवाडीचा !!बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , खेतवाडी १० वी गल्ली

बाप्पा खेतवाडीचा !!
बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , खेतवाडी १० वी गल्ली

ओमकार स्वरूपा ! अनाथांच्या नाथा !!
तुज नमो ! तुज नमो !! तुज नमो !!

जनमानसातील सर्वांचे लाडके दैवत म्हणजे आपला गणपती बाप्पा !  त्याचे तेजपुंज विलोभनीय रूप पाहताच भक्त मंडळी तहान भूक विसरतात. 
स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या तत्वांना अनुसरून, जनजागृती आणि लोकांची एकजूट होणे हा हेतू मनात बांधुन खेतवाडी १० व्या गल्लीतील दत्ता मुंगसे, राजन पुजारी, दिनानाथ होडावडेकर, शिवाजी साळुंके, निशिकांत तावडे या तरुण मंडळींनी एकत्र येऊन १९५६ साली १० वी खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली त्यांनतर पुढे वसंत आगावणे, हनुमंत कदम, पप्पा आर्ते आदी  कार्यकर्त्यांनी मंडळाचा विस्तार केला. 

पूर्वीच्या काळी वर्गणी वगैरे खूप अल्प स्वरूपात गोळा व्हायची. त्यामुळे गल्लीतील लहान मुलेच आपल्यातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून सार्वजनिक उत्सवात नकला, गाणी आणि नाच असे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करत असतं. गणेशोत्सव कालावधीत संध्याकाळी विविध स्पर्धाचे आयोजिन केले जायचे.

माझे बाबा गजानन येजरे  गेली ६० वर्षे या मंडळाचे कार्यकर्ते असल्यामुळे मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाचे स्वतः साक्षीदार आहेत. त्यामुळे मंडळाची जढण-घडण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे, अनुभवली आहे.

१९७० नंतर काही कार्यकर्त्याच्या असे लक्षात आले की आपण गणेशोत्सवात चित्रकथेच्या माध्यमातून एखादी प्रबोधनात्मक कथा, चित्र स्वरूपात मांडून समाज प्रबोधन कार्य सुरू करावे आणि त्यांनी त्यास सुरुवातही केली.

१९८५ नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चलचीत्र स्वरूपात ती सादर करण्याची प्रथा सुरू केली आणि काय आश्चर्य ते पाहण्यास प्रचंड गर्दी जमू लागली. या नंतरच्या कालवधीत प्रकाश मिस्त्री, गजानन येजरे, दिपक देवधरकर, नरेश पटेल, विनायक करलकर, लक्ष्मण आंग्रे, अनिल पडवळ, योगेश पटेल, जयेश पटेल, दीपक आंद्रे, अरुण भणगे, राजू मुंगसे, विलास साळुंके, प्रमोद साळुंके, नीरज सर्वय्या अश्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी मंडळाची धुरा सांभाळली. 

या पिढीतील कार्यकर्त्यांनी मंडळा अंतर्गत बरेच बदल घडवून आणले. व्याख्यानमाला आयोजित करणे, मुलांच्या स्पर्धा भरवणे, शाळेतील गुणवान  विद्यार्थ्यांचा सत्कार, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, ऑर्केस्ट्रा असे विविध उपक्रम राबवून परिसरातील सर्व लोकांचे मन जिंकले. तसेच मंडळाच्या वतीने दर वर्षी लहान मुलांना वह्या वाटप, दिवाळीमध्ये धान्य वाटप, रक्तदान शिबिर असे लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात.

माजी कार्यकर्त्यांनी सध्या आजच्या तरुण पिढीला मंडळात सामावून घेतले आहे. योगेश पटेल तसेच अध्यक्ष महोदय अरुण भणगे यांच्या मार्गदर्शनाने आजच्या युवा पिढीतील कार्यकर्ते मंडळाचे कामकाज आधुनिक पद्धती अनुसरून उत्तमरित्या सांभाळत आहेत. नुकताच, ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी मिळून बाप्पा खेतवाडीचा आगमन सोहळा जल्लोषात पार पाडला. 

आमचे खेतवाडी १० वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दक्षिण मुंबईतील प्रमुख मंडळा पैकी एक असून, मंडळाचे हे ६८ वे वर्ष आहे. आजपर्यंत मंडळाने गणेश मूर्ती तथा देखाव्यासाठी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्यामुळे गणपतीत गल्लीला जणू जत्रेचे स्वरूप येते. 

यंदा मंडळाने बाप्पाच्या विलोभनीय मूर्तीसोबत समुद्रमंथनाचे चलचित्र सादर केले आहे. पुराणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमधील आघाडीचा प्रसंग म्हणजे समुद्रमंथन. या समुद्रमंथनातून १४ महत्त्वाची रत्ने बाहेर आली. हे सादरीकरण पाहण्यासाठी सर्वांनी नक्कीच यायाचं आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. ही विनंती !

समस्त गणेशभक्त मंडळींकडून आपल्या मंडळास खूप खूप शुभेच्छा !! "बाप्पा खेतवाडीचा" हा जयघोष जनमानसात असाच कायम दुमदुमत राहो !! खेतवाडी १० वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो !! हीच बाप्पा चरणी  प्रार्थना !! 

🌸 गणपती बाप्पा मोरया !! 🌸
🌸 मंगलमूर्ती मोरया !! 🌸
-----------
सौ. ऋतुजा तिर्लोटकर (M. Com)
भ्रमणध्वनी : +९१ ८३५५९ ४९७३५
m.yejre@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही