इक्बाल मेमन यांची मेमन समाजाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड

इक्बाल मेमन यांची मेमन समाजाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या अध्यक्षपदी इक्बाल मेमन ऑफिसर यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. मेमन जमातच्या मुंबईत हज हाऊस मध्ये नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व मेमन अधिवेशनात याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 
२०२३ ते २०२७ अशा चार वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना केलेल्या समाजोपयोगी कामांवर विश्वास ठेवून समाजाने पुन्हा बिनविरोध निवड केली आहे, त्यामुळे मेमन यांनी सर्वांचे आभार मानले.  मेमन समाजाला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही इक्बाल मेमन यांनी निवडीनंतर व्यक्त केली. 
या कार्यक्रमाला माजी खासदार अॅड मजीद मेमन, माजी आमदार सोहेल लोखंडवाला, मौलाना मोईनुद्दीन अश्रफ, निजामुद्दीन राईन, डॉ. अब्दुस समी बुबेरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब