रिक्षा टॅक्सी, स्कुल बस, खाजगी वाहने, ट्रेलर, ट्रक आदी वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करा हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रिक्षा टॅक्सी, स्कुल बस, खाजगी वाहने, ट्रेलर, ट्रक आदी वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करा हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - 
- रिक्षा-टॅक्सी, स्कुल बस, खाजगी वाहने, ट्रेलर, ट्रक इ. वाहनावर ज्याप्रकारे ऑनलाईन कारवाई करून दंड आकारले जात आहेत व दंड न भरल्यास त्या वाहनावर जप्ती आणली जात आहे.  या प्रकारांमुळे वाहन चालकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
त्यामुळे या वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करा  
अशी मागणी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष 
हाजी अरफात शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

रिक्षा टॅक्सी चालक हा दिवसभरात जेमतेम ४०० ते ५०० रुपये कमावतो व त्यावर तो घर चालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात जर वाहन १ इंच जरी झेब्रा क्रॉसिंग च्या पुढे गेले अथवा सिग्नल चुकून तोडला की लगेच ट्रॅफिक पोलीस अधिकारी तत्काळ त्या वाहनांचा फोटो काढून त्यावर ऑनलाईन दंडाची कारवाई करतात तो दंड जवळपास ५०० ते १००० रु. इतका असतो.
मुळात  कमी उत्पन्न मिळत असताना तो रिक्षा-टॅक्सी चालक दंड भरेल का स्वतःच घर चालवेल, जर त्याला पुरेसा पैसा नाही मिळाला तर त्याच्या कुटुंबाला एक वेळचे जेवण तरी मिळेल का ? हा मोठा गंभीर प्रश्न रिक्षा व टॅक्सी चालकांना नेहमी भेडसावत असतो.

एक गरीब रिक्षा टॅक्सी चालक हा जेव्हा सकाळी काम धंद्याकरीता बाहेर पडतो, त्यानंतर कुठे वडापाव खाण्यासाठी थांबला की लगेच ट्राफिक अधिकारी त्याच्या वाहनाचे फोटो काढून दंड आकारतात. एखाद्या हॉस्पिटल बाहेर वयोवृद्ध महिलेस सोडत असल्यास लगेच नो पार्किंग चा दंड आकारला जातो. शौचालयास गेला तरी नो पार्किंग दंड आकारला जातो. जसे बेस्ट ला त्याची हक्काची जागा आहे ते तिथे आरामात बसून जेवन करू शकतात व इतर कामे करू शकतात. त्याचप्रकारे गरीब रिक्षा टॅक्सी वाल्यांना त्याच्या हक्काचे स्टॉप मिळालेच पाहिजे, ना त्यांना खाण्यापिण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नाही आहे. 
का रिक्षा टॅक्सी चालक हा माणूस नाही का...? तो थोडावेळ शांत आपल्या वाहनात बसून दोन घास सुखाचे खाऊ देखील शकत नाही का... ? हा अन्याय रिक्षा टॅक्सी वाहतूकदारांवर का....? असा प्रश्न हाजी अरफात शेख यांनी उपस्थित केला आहे. 

त्यामुळे  महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना व गोरगरीब रिक्षा टॅक्सी चालक / मालक व स्कूल बस अथवा इतर वाहनावर जर चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन दंड किंवा चुकीच्या कारवाया केल्या असतील तर त्वरित ते दंड माफ करून वाहन जप्तीच्या कारवाया थांबवाव्यात,  अशी मागणी हाजी अरफात शेख यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने या विषयात लक्ष घालून आम्हा वाहतूकदारांना न्याय मिळवून द्यावा व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन रिक्षा टॅक्सी व इतर वाहनांवर असेलेले सर्व दंड त्वरित माफ करून वाहतूकदारांना तत्काळ दिलासा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी हाजी अरफात शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही