मीरा जोशीसाठी मंगळवार महत्त्वाचा दिवस, 'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' गाणे मंगळवारी रिलीज होणार व झी मराठीवर 'दार उघड बये दार उघड' मालिकेत 'चंपा' ची एन्ट्री होणार

मीरा जोशीसाठी मंगळवार महत्त्वाचा दिवस,  'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' गाणे मंगळवारी रिलीज होणार व झी मराठीवर 'दार उघड बये दार उघड' मालिकेत 'चंपा' ची एन्ट्री होणार
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 
अभिनेत्री, नृत्यांगणा मीरा जोशीसाठी मंगळवार महत्त्वाचा दिवस ठरला आहे. मीरा जोशीवर चित्रित झालेले 'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' हे गाणे मंगळवारी रिलीज होत आहे.  तसेच झी मराठीवर 'दार उघड बये दार उघड' मालिकेत 'चंपा' च्या भूमिकेतून मीराची एन्ट्री होणार आहे. 
'माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड' या गाण्याचे चित्रीकरण उरण येथील समुद्रात  करण्यात आले आहे.  गाण्याचे चित्रीकरण होत असताना मीरा  जोशी, तिचा हिरो व इतर जण शुटिंग दरम्यान पाण्यात पडले मात्र सुदैवाने ते वाचले, अशी आठवण मीरा जोशी यांनी सांगितली. 'कचकच कांदा' फेम गायिका राधा खुडे यांनी हे गाणे गायले आहे. टिप्स मराठी तर्फे हे गाणे तयार करण्यात आले आहे  या गाण्याच्या प्रमोशनसाठी मीरा जोशी ने सेव्ह द डेट असा सोशल मीडिया वर संदेश दिला होता मात्र मीराच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. 


झी मराठी वरील 'दार उघड बये दार ' या मालिकेमध्ये चंपाच्या भूमिकेत मीरा जोशीची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत तिचे शरद पोंक्षेंसोबत सर्व सीन आहेत. या मालिकेत तिची तमाशीवालीची भूमिका आहे.  ही भूमिका करताना तिला 
सुरुवातीला थोडेसे अन कम्फर्टेबल वाटत होते मात्र पोंक्षेंनी संवाद साधून तिचा नर्व्हसनेस घालवला. नथ घालून टिपिकल तमाशावालीची भूमिका तिने या मालिकेत साकारली आहे. 
सचिन पाटील 
यामध्ये मीरा तमाशावालीची भूमिका पहिल्यांदाच करत आहे. 'तुझ माझ ब्रेक अप' या मालिकेनंतर मीरा पाच वर्षानंतर झी मराठीवर कमबँक करत आहे. एकूणच दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून मीरा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही