पुण्यात ८ ऑक्टोबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन

पुण्यात ८ ऑक्टोबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन,  

महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील  निवड पात्र खेळाडू सहभागी होणार

लोकमानस -प्रतिनिधी
मुंबई - 
कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, बाणेर, पुणे
येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी दिली आहे.
     सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाड २४ व २५ डिसेंबर २०२३ रोजी  तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद,२०२३ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आप आपापल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर  खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करावी असे आवाहन राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना  यामाध्यमातून केले आहे.
     ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन, साऊथ एशियन कराटे फेडरेशन, वर्ल्ड कराटे फेडरेशन व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन मान्यतेने संपन्न होणार आहे.
    तरी या राज्य सब ज्युनिअर कराटे स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.karatemaharashtra.in याठिकाणी संकेतस्थळावर किंवा आमचे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाचे अधिकृत प्रतिनिधी किंवा राज्य महासचिव संदीप गाडे मोबा.९८९२१५२१९७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही