सामाजिक कायदे राबविण्याची जबाबदारी सामाजिक संघटनांची - डॉ. नीलम गोऱ्हे

सामाजिक कायदे राबविण्याची जबाबदारी सामाजिक संघटनांची -  डॉ. नीलम गोऱ्हे, 

 गोऱ्हे यांच्या हस्ते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ या अनुभव कथन पुस्तकाचे प्रकाशन
लोकमानस प्रतिनिधी
वसई : महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्तींनी केलेल्या प्रबोधनामुळेच महाराष्ट्र घडला आहे. जागतिक, वैश्विक, घटनात्मक चौकट समजली की समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडता येते. तसेच सरकारने केलेल्या सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सामाजिक संघटनांची असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. 
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित यांच्या ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ या अनुभव कथन पुस्तकाचे आणि आम्ही काय र चिखुल खावा?  याच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सनराइज बँक्वेट बाभोळा वसई (पश्चिम)येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. 


 डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, समाजाची मानसिकता महिलांना कमी लेखणारी असते. त्यामुळे महिलांमध्ये धैर्य राहत नाही. मात्र हे धैर्य लोकांशी संवाद साधल्याने येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. लोकांच्या आंदोलनातून ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत असल्याची भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 

बालमजुर, अत्याचारित स्त्रियांचे पुनर्वसन होणे आवश्यक असून सरकार समोरील मोठे आव्हान असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी म्हटले. प्रशासनाची वेळोवेळी मदत होत असली तरी काही वेळा त्यांच्यावरही दबाव असतो. त्यातून न्याय मिळायला वेळ लागतो. श्रमजीवी संघटनेकडून करण्यात येणारे काम बहुमूल्य असे आहे. पुस्तकातून माणूस म्हणून जगण्यासाठीचा संघर्ष समजतो हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाचा उपयोग समाजातील वंचितांसाठी कायमच होत आला आहे तो पुढेही होत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 विवेक पंडित यांनी लोकप्रतिनिधी म्हणून परत यावे 

विवेक पंडित यांनी विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यांपैकी कोणत्याही एका सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा यायला पाहिजे. संघटनेसोबत त्यांनी सभागृहात असणं गरजेचं आहे. त्यांनी हार मानू नये. त्यांच्यासाठी दरवाजे उघडे असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले.

 विवेक पंडित म्हणाले, पराभूत मानसिकतेचा प्रत्यय सर्वच वर्गात दिसतो. याविरोधात आवाज कसा उठवायचा हे या पुस्तकातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आजही अनेक महिलांना वेठबिगारी करावी लागते. महिलांवर होणाऱ्या अन्यायाला विधानभवनात बैठका घेऊन न्याय देण्याचे काम  गोऱ्हे यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी, प्रा. अशोक बागवे,  अशोक मुळे, डॉ. नेहा सावंत, विधिज्ञ सुरेश कामत, सुरेश रेंजड आणि डॉ. नितीन आरेकर,  नम्रता मुळे, शिवसेना जिल्हा प्रमुख  निलेश तेंडुलकर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, तहसीलदार कोष्टी यांसह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले तर आभार प्रदर्शन  स्नेहा पंडित-दुबे यांनी केले.
------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही