पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशाची एकता अबाधित ठेवणे आवश्यक -अबू आझमी, समाजवादी पक्षातर्फे ईद मिलन संपन्न

इमेज
देशाची एकता अबाधित ठेवणे आवश्यक -अबू आझमी,   समाजवादी पक्षातर्फे ईद मिलन संपन्न लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - सध्या देशातील वातावरण अत्यंत असहिष्णू झाले झाले आहे. परस्परांमधील अविश्वास वाढीस लागला आहे.  मात्र देश एकसंध राहण्यासाठी आपल्या देशाची एकता अबाधित ठेवणे आवश्यक आहे,  असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी केले.  रमजान ईद निमित्त पत्रकारांसाठी आझमी यांच्यातर्फे ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन इस्लाम जिमखाना येथे करण्यात आले होते. त्यावेळी आझमी बोलत होते.   आझमी म्हणाले,  शहरांची जुनी नावे बदलणे अत्यंत चुकीचे आहे. नावे बदलण्यापूर्वी देेशातील रामपूर, सीतापूर ही नावे कोणी ठेवली याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.  देशातील सध्याच्या वातावरणात पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे.  यावेळी पक्षाचे प्रवक्ते अब्दुल कादर चौधरी,   मेराज सिद्दीकी,  रुक्साना सिद्दीकी, फहद अहमद  व पदाधिकारी उपस्थित होते.  ज्येष्ठ पत्रकार खलील जाहिद,  डॉ.  समी बुबेरे,   मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे , मराठी पत्रकार परिषदेचे मुंबईचे अध्यक्ष राजा आदाटे,  ह

सामूहिक बलात्कार व पोक्सो मधील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

सामूहिक बलात्कार व  पोक्सो मधील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन प्रतिनिधी  मुंबई - सामूहिक बलात्कार  व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या १९ वर्षीय आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. या घटनेतील पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती स्वतः घराबाहेर निघून आरोपींसोबत गेल्याचे व त्यांच्यासोबत  शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी हा निकाल दिला. मोठया प्रमाणात खटले प्रलंबित असल्याने नजिकच्या भविष्यकाळात हा खटला सुनावणीस येण्याची  शक्यता दुरापास्त आहे. १९ वर्षीय आरोपीला तोपर्यंत कोठडीत ठेवल्याने त्याचे कठोर गुन्हेगारात रुपांतर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. मजीद मेमन, अॅड. मतीन कुरैशी व अॅड. खलील गिरकर यांनी काम पाहिले तर सरकारच्या वतीने ए.ए.टाकळकर यांनी काम पाहिले.  आरोपीला ३० हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले.  या प्रकरणातील आरोपी सुमारे दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत.   याप्रकरणी आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, आरोपीला या प्रकरणात चुकीच्या

अभिनेत्री जिया खान आत्महत्या, सूरज पांचोली निर्दोष मुक्त

इमेज
  अभिनेत्री जिया खान आत्महत्या, सूरज पांचोली निर्दोष मुक्त लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी हा निकाल दिला.  ३ जून २०१३ रोजी जिया खान हिचा मृतदेह तिच्या घरात सापडला होता. तिची आई राबिया खान यांनी  मुलीच्या आत्महत्येबाबत सूरज पांचोलीला जबाबदार धरले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पांचोलीविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती.  १० वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. पुराव्यांअभावी सूरज पांचोलीला निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. 

रविवारी राष्ट्रीय लोक अदालत

रविवारी राष्ट्रीय लोक अदालत मुंबई -  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने मुंबई शहरामध्ये सर्व न्यायालयात रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही. तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास वेळेची व पैशाची बचत होते.  यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित व दाखलपूर्व असे एकूण ११हजार १५५ इतकी प्रकरणे निकाली लागली व तडजोडीचे मूल्य एक हजार कोटी होते.  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढण्यासाठी ज्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे तेथे अर्ज करुन राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा अथवा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा व तडजोडीद्वारे प्रकरण निकाली काढावे असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई  चे प्रधान न्यायाधीश, अनिल सुब्रमण्यम व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत द

बंदर व गोदी कामगारांची प्रमुख मागण्यांसाठी प्रचंड निदर्शने

इमेज
बंदर व गोदी कामगारांची प्रमुख मागण्यांसाठी प्रचंड निदर्शने लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  भारतातील प्रमुख बंदरातील गोदी  कामगारांसाठी वेतन करार व बोनस करार त्वरित करावा, मागील वेतन कराराची थकबाकी एक रकमी द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिकाम्या जागा त्वरित भराव्यात इत्यादी मागण्यासाठी मुंबई, कोलकत्ता, कांडला, गोवा,चेन्नई, विशाखापटनम, तुतिकोरीन, कोचीन, परादीप, न्यू मंगलोर व इतर  प्रमुख बंदरातील  बंदर व  गोदी  कामगारांनी जेवणाच्या सुट्टीत प्रचंड निदर्शने केली. मुंबई बंदरात इंदिरा  गोदीत आंबेडकर भवन समोर झालेल्या निदर्शनामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये  यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  मिळविलेल्या मागण्या काढून घेण्याचे काम चालू आहे,  याविरुद्ध आपणास  सर्वांना एकजुटीने संघर्ष करावा लागेल. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर जर  झोपडपट्टी धारकांना घरे मिळत असतील तर गोदी कामगारांना घरे का मिळू नयेत. याप्रसंगी  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी विश्वस्त व मुंबई पोर्ट  ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी  सूधाकर अपराज, युनियनचे सेक्रेटरी विद्या

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जय जित सिंह, सदानंद दाते व बिपिन कुमार सिंह यांना पोलिस महासंचालक पदी पदोन्नती

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या,  जय जित सिंह, सदानंद दाते व बिपिन कुमार सिंह यांना पोलिस महासंचालक पदी पदोन्नती   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच दिले आहेत. जय जित सिंह, सदानंद दाते व बिपिन कुमार सिंह यांना पोलिस महासंचालक पदी पदोन्नती  देण्यात आली आहे.   सिंह यांना ठाण्याच्या पोलिस आयुक्त पदी कायम ठेवण्यात आले आहे. दाते याना दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर, सिंह याची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे.  पंजाबराव उगले यांची बदली ठाण्याच्या अपर पोलिस आयुक्त, गुन्हे या पदावर करण्यात आली आहे. मिलींद मोहिते यांची बदली पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग या पदावर करण्यात आली आहे. राजलक्ष्मी शिवणकर यांची बदली रा.रा.पोलिस बल, गट क्रमांक ७ दौंड येथे समादेशक पदावर करण्यात आली आहे. पोलिस उप महानिरीक्षकांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची नावे व बदलीचे पद  संजय दराडे -विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्ह

राहुल गांधी यांचा अर्ज सूरत न्यायालयाने फेटाळला, उच्च न्यायालयात दाद मागणार

राहुल गांधी यांचा अर्ज सूरत न्यायालयाने फेटाळला, उच्च न्यायालयात दाद मागणार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे शिक्षा दिल्याच्या विरोधात गांधी यांनी सूरत न्यायालयात याचिका दाखल केली होती.  मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे गांधी यांना आता उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.  मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर खटला चालून त्यांना दोन वर्षांची शिक्षा मिळाली आहे.  त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.  २०१९ मध्ये केलेल्या वक्तव्याबाबत शिक्षा ठोठावण्याच्या विरोधात सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसतर्फे देण्यात आली आहे. या प्रकरणी १३  एप्रिल रोजी सुनावणी झाली होती व २० एप्रिलपर्यंत निर्णय राखून ठेवण्यात आला होता. 

कोकण बॅंकेचे संचालक मंडळ बिनविरोध विजयी, नजीब मुल्ला व आसिफ दादन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवर विश्वास

 कोकण बॅंकेचे संचालक मंडळ बिनविरोध विजयी,   नजीब मुल्ला व आसिफ दादन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवर विश्वास  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  कोकण मर्कंटाईल को- ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (कोकण बॅंक) संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. २०२३ ते २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.  या निवडणुकीसाठी १६ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात असल्याने संचालक मंडळ बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी देखील बिनविरोध निवड झाली होती. कोकण बॅंकेचे अध्यक्ष नजीब मुल्ला व उपाध्यक्ष आसिफ दादन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांबाबत विश्वास ठेवत निवडणूक बिनविरोध झाल्याने मुल्ला व दादन यांनी याबाबत सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत.  १९६९ मध्ये स्थापन झालेल्या या बॅंकेला २०१९ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. सध्या २५ शाखांच्या माध्यमातून बॅंकेचे काम सुरु आहे. बॅंकेचे ५४ हजार सभासद असून दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे.    सन २०२३- २८ या कालावधी करिता नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे - नजीब मुल्ला ,आसिफ दादन, डॉ. शाहिद बरमारे,असगर डबीर,दिलीप मुजावर,बशीर मुर्

टोरंट पॉवरतर्फे शिळ-मुंब्रा-कळवा नागरिकांसाठीदावत-ए-इफ्तार

टोरंट पॉवरतर्फे शिळ-मुंब्रा-कळवा नागरिकांसाठी  दावत-ए-इफ्तार लोकमानस प्रतिनिधी   शिळ-मुंब्रा-कळवा नागरिकांसाठी टोरंट पॉवरतर्फे डायमंड बॅँकवे हॉल - कौसा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी,  राजकीय पदाधिकारी,  पत्रकार व  प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.  टोरंट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुधीर देशमुख, जीवन क्लार्क, जय पंड्या, चेतन बदियानी यांसह  टोरंट टीमने सर्व पाहुण्यांचे  स्वागत केले.  मुफ्ती सय्यद फैझ यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान आणि इफ्तारचे महत्त्व समजावून सांगितले. पाहुण्यांनी टोरेंट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक केले आणि सांगितले की अशा कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता आणि एकोपा निर्माण होण्यास मदत होते.  सोमवारी भिवंडीतील नागरिकांसाठी देखील कंपनी द्वारे इफ्तार  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती  जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली. 

पोक्सोचा गुन्हा नोंदवलेल्या अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून अंतरीम जामीन

  पोक्सोचा गुन्हा नोंदवलेल्या अल्पवयीन आरोपीला  उच्च न्यायालयाकडून अंतरीम जामीन, अल्पवयीन तरुणाविरोधात पोक्सोचा गुन्हा व आरोपपत्र दाखल करणे चुकीचे असल्याचे आदेशात नमूद प्रतिनिधी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केलेला आरोपी प्रत्यक्षात अल्पवयीन असल्याने त्याला मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अंतरीम जामीन दिला आहे. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी बांगूरनगर पोलिस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. अल्पवयीन आरोपीच्या वतीने अँड मजीद मेमन, अँड मतीन कुरैशी व अँड खलील गिरकर यांनी काम पाहिले. तर, पोलिसाची बाजू सहाय्यक सरकारी वकिल आर. एम. पेठे यांनी मांडली दिडोशी येथील विशेष न्यायालयात याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपी २४ मार्च २०२२ पासून तुरुंगात आहे. तरुण व तरुणीमध्ये सुरुवातीला दोन वेळा जेव्हा शारीरिक संबंध घडले तेव्हा आरोपी अल्पवयीन होता तर पुढील दोन्ही प्रसंगात आरोपी व तकारदार दोन्ही 18 वर्षापेक्षा मोठे होते. त्यामुळे No chargesheet could have been filed against him before specal court for offences under POCSO Act

मी राष्ट्रवादीतच आहे व जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, अजित पवारांचे स्पष्टीकरण भाजपसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले

 मी राष्ट्रवादीतच आहे व जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, अजित पवारांचे स्पष्टीकरण, भाजपसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई-  मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे, जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करीत राहीन. सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात असलेल्या माझ्याबद्दलच्या बातम्यांत काहीही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. आपल्याबाबत सातत्याने दिल्या जात असलेल्या  या बातम्यांना काहीही आधार नाही. त्या जाणिवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवरील फोक दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पवार म्हणाले. मी पक्षात राहीन याबाबत प्रतिज्ञापत्र करुन देऊ का असा प्रश्न त्यांनी  विचारला.  मी भाजपसोबत जाण्याचे वृत्त चुकीचे आहे, आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे वृत्त देखील निराधार आहे.  बातम्या देताना थोडीशी सभ्यता पाळण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका असा इशारा त्यांनी दिला. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमच

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

  महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान  लोकमानस प्रतिनिधी          नवी दिल्ली  : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना   राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी ,   कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या  आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.             येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने  17 ते 21  एप्रिलपर्यंत  ‘ राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह ’  साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते ,  केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील ,  विभागाचे सचिव सुनील कुमा

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

इमेज
लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान लोकमानस प्रतिनिधी   नवी मुंबई -  वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले. राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री

मुंबा कौसा येथील इफ्तार मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
  मुंबा कौसा येथील इफ्तार मोठ्या उत्साहात साजरा लोकमानस प्रतिनिधी मुंब्रा - मुंबा कौसा येथे आयोजित करण्यात आलेला रोजा इफ्तार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एस. के. रेसिडेन्सी समोरील या इफ्तारला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सगीर राजू अन्सारी यांच्यातर्फे या इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी इफ्तारची वेळ झाल्यानंतर नागरिकांनी रोजा सोडला व इफ्तार केला. यावेळी मौलानांनी प्रार्थना केली. मुंब्रा कौसा परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, समाजवादी पक्षाचे आदिल खान आझमी, बिल्डर शब्बीर खान, अझिम शेख, माजी नगरसेवक जफर नोमाणी, एमआयएमचे मुंब्रा अध्यक्ष सैफ पठाण यांनी या इफ्तारला हजेरी लावली.

शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट

इमेज
  शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट लोकमानस प्रतिनिधी- मुंबई  ज्येष्ठ अभिनेते, माजी केंद्रीय मंत्री, तृणमुल कॉंग्रेसचे लोकसभा खासदार  शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व सेंसाॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे देखील उपस्थित होते .

मोंड ग्रामस्थ विकास मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

इमेज
मोंड ग्रामस्थ विकास मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न प्रतिनिधी  मुंबई मोंड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबईला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. दादर येथील शिवाजी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला मोंड ग्रामस्थांनी व मंडळाच्या हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. चाळीस वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थांसाठी कार्यरत असणे हे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे काम असून ग्रामस्थांना देखील त्याची जाणिव असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विशेष पाहुणे म्हणून मोहन गोरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शरद कुळकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मोंड ग्रामस्थ विकास मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीची त्यांनी यावेळी माहिती दिली. संस्था चालवणे किती जिकीरीचे व आव्हानात्मक काम आहे. त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी, समस्या उद्भवतात त्याबाबत कुळकर्णी यांनी माहिती दिली. गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेली संस्थेची ही

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मर्जिया पठाण मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर

इमेज
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मर्जिया पठाण मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर लोकमानस प्रतिनिधी प्रतिनिधी मुंबा - रमजान महिन्यात मुंब्रा मधील वाहतूक कोंडीत वाढ होते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी  मर्जिया पठाण मध्यरात्री दोन अडीच वाजेपर्यंत रस्त्यावर उभी राहुन वाहतूक कोंडी सोडवत आहे. त्यामध्ये सुमारे ३० स्वयंसेवकांचे त्यांना सहकार्य मिळत आहे. ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांची ती कन्या आहे.  मुंबा हे माझे शहर असल्याने या शहराची जबाबदारी देखील माझी आहे. या शिकवणीप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून मर्जिया पठाण सातत्याने दर रमजान महिन्यात हे काम करत आहे. मुंब्रा कौसा शहरातून जाणारा मुख्य मार्ग हा जुना मुंबई पुणे महामार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच मोठी गर्दी असते. रमजान महिन्यात या ठिकाणी खाण्यापिण्याच्या वस्तूंचे स्टॉल लावले जातात. अमृत नगर परिसरात असलेल्या गुलाब पार्क मार्केटमध्ये रमजानमध्ये खरेदीसाठी मुंब्रा कौसा परिसरातून व इतर परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. मुंब्रा बायपास रस्त्याची डागडुजी करण

दाऊदी बोहरा समाजाची रात्रभर जागून प्रार्थना, धर्मगुरुंचा वाढदिवस साजरा

इमेज
दाऊदी बोहरा समाजाची रात्रभर जागून प्रार्थना,  धर्मगुरुंचा वाढदिवस साजरा सारा पुरी- मुंब्रा  दाऊदी बोहरा समाजाचे ५३वे धर्मगुरू अली कादर मुफद्दल मौला यांचा ८० वा वाढदिवस मुंब्रा येथे साजरा करण्यात आला. आनंद कोळीवाडा येथील अल बुरहानी मशिदीत लैलतुल कद्रच्या रात्री दाऊदी बोहरा समाजाने  रात्रभर जागून प्रार्थना केली. बोहरा समाज रमजान महिन्यातील 23वी रात्र लैलतुल कदर (शबे कद्र) म्हणून साजरी करतो, दोन दिवस आधीपासून या रात्रीची तयारी समाजात सुरू करण्यात आली होती.   जगभरात पवित्र रमजान महिना सुरू असून, रमजान महिना संपताच जगभरात ईद मुबारकचा सण साजरा होणार आहे. रमजान महिन्यात अशीही एक रात्र आहे जी ईश्वराने हजारो रात्रींपेक्षा चांगली बनवली आहे, या रात्रीलाच शब-ए-कद्रची रात्र म्हटले जाते, जी सर्वात मोठी रात्र आहे.   बोहरा समाजाने नातेवाईक, मित्र आणि शेजारी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.  माजी नगरसेवक राजन किणे यांनीही फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सय्यदना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छा संदेश दिले. समाजाचे सदस्य शब्बीरभाई मकासर यांनी सांगितले की, प्रार्थनेच

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री  लोकमानस प्रतिनिधी मुंबई-  मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील १.२३ किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती  महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवी मुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. ही व

मार्शल आर्ट प्रशिक्षक याकूब खान यांचा बेस्ट स्पोर्टस एमएमए टीचर पुरस्काराने गौरव

इमेज
मार्शल आर्ट प्रशिक्षक याकूब खान यांचा बेस्ट स्पोर्टस एमएमए टीचर पुरस्काराने गौरव मुंबई  गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा कौसा मध्ये कराटे प्रशिक्षण देणाऱ्या  याकूब खान यांना नुकताच बेस्ट स्पोर्टस टीचर एमएमए ( मिक्स मार्शल आर्ट) पुरस्काराने गौरवण्यात आले.  ऑल इंडिया मिक्स मार्शल आर्ट एसोसिएशनचे संस्थापक डेनियल सोलोमन इसाक यांनी मिक्स मार्शल अँक्टच्या परीक्षक, सामनाधिकारी यांचा दिल्लीतील ताज पैलेस हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.  देशाच्या विविध राज्यातून एमएमए क्षेत्रातील प्रशिक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुंब्रा कौसा येथून उपस्थित राहिलेल्या याकूब खान यांना एआयएमएमएए च्या राष्ट्रीय आयुक्त लावरेले तानिया इसाक यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन याकूब खान यांचा सत्कार करण्यात आला.  प्रशिक्षक म्हणून खान यांनी 9 राज्यात जावून  मुलांना प्रशिक्षण दिले आहे.  देशभरातील सुमारे एक हजार पेक्षा अधिक मुलांना खान यांनी मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले आहे.  स्पोर्टस एमएमएच्या क्षेत्रात याकूब खान यांनी केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील आपले नाव गाजवल

बार्टी च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 बार्टी च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने  सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि  शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश पर

मुसन्ना मिया यांचा २० वा उर्स संपन्न

इमेज
मुसन्ना मिया यांचा २० वा उर्स संपन्न मुंबई -  शहीद ए राहे मदिना मुसन्ना मिया यांचा २० वा उर्स नुकताच मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. मुसन्ना मिया यांचे सुपुत्र तथा ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मौलाना सय्यद शाह मोईनुद्दीन अश्रफ यांनी यावेळी दुआ केली.  नागपाडा दो टाकी येथील सुन्नी मस्जिदे बिलालमध्ये  सायंकाळी इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर  मध्यरात्री दोन वाजता दुआ व त्यानंतर सेहरी करण्यात आली.  रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी, राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सय्यद अली अश्रफ स्वागतासाठी उपस्थित होते. मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सह पोलिस आयुक्त सत्यनारायण, पोलिस उपायुक्त अकबरखान पठाण, नागपाडा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री मिलींद देवरा, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, माजी मंत्री अस्लम शेख, भाजपचे नेते कृपाशंकर सिंह, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेखकुरैश समाजाचे सिराज कुरैशी, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माज

सलामती पीर यांचा उर्स देहुरोड येथे संपन्न

इमेज
सलामती पीर यांचा उर्स देहुरोड येथे संपन्न मुंबई -  हजरत सुफी ख्वाजा शेख आलमगीर शाह काद्री अल चिश्ती इफ्तेखारी (सलामती पीर) यांचा उर्स देहूरोड येथे नुकताच संपन्न झाला. ऊर्सचे यंदाचे ११ वे वर्ष होते.या उर्ससाठी मोठी गर्दी झाली होती.  माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार अमर साबळे, गुजरातचे मंत्री जितूभाई वाघेला, मुफ्ती मंजूर जियाई, अभिनेता रझा मुराद, अली खान, सिकंदर खान यांच्यासहित विविध मान्यवरांनी उर्समध्ये सहभाग घेतला.  ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष मौलाना मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया) यांनी दुआ केली. सलामती पीर यांचे सुपुत्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. राज्याच्या विविध भागातून मौलाना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावेळी उपस्थित राहून सलामती पीर यांना अभिवादन केले. 

मुंब्रा ते पनवेल बस सुरु करा, मुंब्रा प्रवासी संघाची मागणी

इमेज
मुंब्रा ते पनवेल बस सुरु करा, मुंब्रा प्रवासी संघाची मागणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंब्रा  ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची वातानुकुलित बस मुंब्रा ते पनवेल व मुंब्रा ते मीरा रोड या मार्गावर सुरु करण्याची मागणी मुंब्रावासीयांकडून करण्यात आली आहे.  मुंब्रा प्रवासी संघातर्फे ही मागणी ठाणे परिवहन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्याकडे करण्यात आली आहे.  मुंब्रा कौसा परिसरातील टीएमटीचे बस थांबे अत्याधुनिक पध्दतीचे करण्यात यावेत, या बसथांब्यासमोर करण्यात येणाऱ्या पार्किंग विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, बस थांब्यावर बस सेवेचे वेळापत्रक लावण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.  यावेळी  अब्दुल्ला पठाण,  रफिक शेख, अन्वारुल खान उपस्थित होते. रमजान कालावधीत मुंब्रा स्थानक ते भारत गिअर पर्यंत विशेष बस सेवा सुरु केल्याबद्दल यावेळी प्रवासी संघातर्फे शमीम खान यांचा सत्कार करण्यात आला. 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह तीन पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह तीन पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय लोकमानस प्रतिनिधी मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. या तीन पक्षांमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, ममता बॅनर्जीमंच्या अध्यक्षतेखालील तृणमुल कॉग्रेस पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा समावेश आहे. तर, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. या पक्षांना राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सूचना दिली होती व आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर या पक्षांतर्फे आपापली बाजू मांडण्यात आली मात्र त्यानंतरही निवडणूक आयोगाचे समाधान झाले नसल्याने या तीन पक्षांना आपला राष्ट्रीय दर्जा गमवावा लागला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, तृणमुल कॉंग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेणार- ॲङ राहुल नार्वेकर यांची बार कॉन्सिलला ग्वाही

इमेज
महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेणार-   ॲङ राहुल नार्वेकर यांची बार कॉन्सिलला ग्वाही  लोकमानस प्रतिनिधी मुंबई  – महाराष्ट्रात वकीलांना मारहाण होण्याच्या घटना वाढत असून त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात "महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा" आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१ हा कायदा बदलून सुधारीत प्रभावी कायदा आणण्याच्या दृष्टीने देखिल प्रयत्न व्हावेत असे मत विधानसभा अध्यक्ष, ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा संस्थेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकीलांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि यासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.  यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी वकीलांनी आपल्या मागण्या विधानसभा अध्यक्षांना सादर केल्या. यासंदर्भात आपण स्वत: पुढाकार घेऊन राज्यपाल,  मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे सुचित करु, असे आश्वासन या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष, ॲङ  राहुल नार