मुसन्ना मिया यांचा २० वा उर्स संपन्न

मुसन्ना मिया यांचा २० वा उर्स संपन्न

मुंबई - 

शहीद ए राहे मदिना मुसन्ना मिया यांचा २० वा उर्स नुकताच मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. मुसन्ना मिया यांचे सुपुत्र तथा ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मौलाना सय्यद शाह मोईनुद्दीन अश्रफ यांनी यावेळी दुआ केली. 



नागपाडा दो टाकी येथील सुन्नी मस्जिदे बिलालमध्ये  सायंकाळी इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर  मध्यरात्री दोन वाजता दुआ व त्यानंतर सेहरी करण्यात आली.  रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी, राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सय्यद अली अश्रफ स्वागतासाठी उपस्थित होते.



मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सह पोलिस आयुक्त सत्यनारायण, पोलिस उपायुक्त अकबरखान पठाण, नागपाडा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री मिलींद देवरा, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, माजी मंत्री अस्लम शेख, भाजपचे नेते कृपाशंकर सिंह, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेखकुरैश समाजाचे सिराज कुरैशी, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, मुंबई युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार जीशान सिद्दीकी, इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार एड युसूफ अब्राहणी, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन, माजी मंत्री शिवसेनेचे आमदार सचिन अहिर, राहुल कनाल, आमदार अमीन पटेल, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, इम्रान कुरैशी, माजी खासदार संजय दिना पाटील, माजी नगरसेवक कप्तान मलिक, एड रिजवान मर्चेंट, माजी आमदार वारिस पठान, माहिम दर्गाहचे विश्वस्त सुहैल खंडवानी, कॉंग्रेसचे प्रवक्ते जाकिर अहमद यांच्यासहित राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.  



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही