देशाची एकता अबाधित ठेवणे आवश्यक -अबू आझमी, समाजवादी पक्षातर्फे ईद मिलन संपन्न

देशाची एकता अबाधित ठेवणे आवश्यक -अबू आझमी,  
समाजवादी पक्षातर्फे ईद मिलन संपन्न
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - सध्या देशातील वातावरण अत्यंत असहिष्णू झाले झाले आहे. परस्परांमधील अविश्वास वाढीस लागला आहे.  मात्र देश एकसंध राहण्यासाठी आपल्या देशाची एकता अबाधित ठेवणे आवश्यक आहे,  असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी केले.  रमजान ईद निमित्त पत्रकारांसाठी आझमी यांच्यातर्फे ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन इस्लाम जिमखाना येथे करण्यात आले होते. त्यावेळी आझमी बोलत होते.  
आझमी म्हणाले,  शहरांची जुनी नावे बदलणे अत्यंत चुकीचे आहे. नावे बदलण्यापूर्वी देेशातील
रामपूर, सीतापूर ही नावे कोणी ठेवली याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.  देशातील सध्याच्या वातावरणात पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे. 
यावेळी पक्षाचे प्रवक्ते अब्दुल कादर चौधरी,  
मेराज सिद्दीकी,  रुक्साना सिद्दीकी, फहद अहमद  व पदाधिकारी उपस्थित होते. 

ज्येष्ठ पत्रकार खलील जाहिद,  डॉ.  समी बुबेरे,  
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे , मराठी पत्रकार परिषदेचे मुंबईचे अध्यक्ष राजा आदाटे,  हिंदी पत्रकार संघाच् अध्यक्ष आदित्य दुबे, मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे,म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष  दिपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही