वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जय जित सिंह, सदानंद दाते व बिपिन कुमार सिंह यांना पोलिस महासंचालक पदी पदोन्नती

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या,  जय जित सिंह, सदानंद दाते व बिपिन कुमार सिंह यांना पोलिस महासंचालक पदी पदोन्नती  

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच दिले आहेत. जय जित सिंह, सदानंद दाते व बिपिन कुमार सिंह यांना पोलिस महासंचालक पदी पदोन्नती  देण्यात आली आहे. 

 सिंह यांना ठाण्याच्या पोलिस आयुक्त पदी कायम ठेवण्यात आले आहे. दाते याना दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर, सिंह याची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे. 

पंजाबराव उगले यांची बदली ठाण्याच्या अपर पोलिस आयुक्त, गुन्हे या पदावर करण्यात आली आहे. मिलींद मोहिते यांची बदली पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग या पदावर करण्यात आली आहे. राजलक्ष्मी शिवणकर यांची बदली रा.रा.पोलिस बल, गट क्रमांक ७ दौंड येथे समादेशक पदावर करण्यात आली आहे. पोलिस उप महानिरीक्षकांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची नावे व बदलीचे पद  संजय दराडे -विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, ए.डी.कुंभारे  -विशेष पोलिस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई , महेश घुर्ये -विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे, संजय शिंदेपोलिस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, ज्ञानेश्वर चव्हाण - विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, डी.आर.सावंत- विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा, मुंबई, आर. बी.डहाळे- संचालक-महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे, अशोक मोराळे- विशेष पोलिस महानिरीक्षक,रा.रा.पोलिस बल, नागपूर, एस.एच.महावरकर-विशेष पोलिस महानिरीक्षक- नांदेड, निसार तांबोळी- विशेष पोलिस महानिरीक्षक-प्रशासन, पोलिस महासंचालक कार्यालय, एस.डी.येनपुरे-विशेष पोलिस महानिरीक्षकगुन्हे अन्वेषष विभाग, पुणे, जे.डी.सुपेकर-विशेष पोलिस महानिरीक्षक-मुख्यालय-कारागृह विभाग-पुणे

के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची बदली विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना, पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई, तर मनोज लोहिया यांची बदली पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आली आहे. 

निवड श्रेणी पोलिस अधीक्षक या श्रेणीतील अधिकाऱ्यांची पदोन्नती पोलिस उप महानिरीक्षक पदावर करण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अभिनव देशमुख-अपर पोलिस आयुक्त-दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई, अनिल पारसकर-अपर पोलिस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, एम.रामकुमार-

अपर पोलिस आयुक्त, वाहतूक-मुंबई, शशिकुमार मीना-अपर पोलिस आयुक्त, गु्न्हे, मुंबई, प्रवीण पाटील-अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग-पुणे, संजय पाटील- अपर पोलिस आयुक्त-नागपूर, वसंत परदेशी-अपर पोलिस आयुक्त-पिंपरी चिंचवड, एस.डी.आव्हाड-पोलिस उप महानिरीक्षक-गुन्हे अन्वेषण विभाग-पुणे, पी.पी.शेवाळे-अपर पोलिस आयुक्त-नागपूर, ए.एच.चावरिया-अपर पोलिस आयुक्त, पुणे वीरेंद्र मिश्रा यांची बदली अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा-मुंबई, तर दिपक साकोरे यांची बदली अपर पोलिस आयुक्त गुन्हे नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब