रविवारी राष्ट्रीय लोक अदालत

रविवारी राष्ट्रीय लोक अदालत
मुंबई - 
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने मुंबई शहरामध्ये सर्व न्यायालयात रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही. तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास वेळेची व पैशाची बचत होते. 

यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित व दाखलपूर्व असे एकूण ११हजार १५५ इतकी प्रकरणे निकाली लागली व तडजोडीचे मूल्य एक हजार कोटी होते. 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढण्यासाठी ज्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे तेथे अर्ज करुन राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा अथवा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा व तडजोडीद्वारे प्रकरण निकाली काढावे असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई 
चे प्रधान न्यायाधीश, अनिल सुब्रमण्यम व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख तसेच नगर दिवाणी व सत्र न्यायालय वकिल संघाचे अध्यक्ष अँड. भास्कर सरवदे यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही