मार्शल आर्ट प्रशिक्षक याकूब खान यांचा बेस्ट स्पोर्टस एमएमए टीचर पुरस्काराने गौरव

मार्शल आर्ट प्रशिक्षक याकूब खान यांचा बेस्ट स्पोर्टस एमएमए टीचर पुरस्काराने गौरव
मुंबई 
गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा कौसा मध्ये कराटे प्रशिक्षण देणाऱ्या 
याकूब खान यांना नुकताच बेस्ट स्पोर्टस टीचर एमएमए ( मिक्स मार्शल आर्ट) पुरस्काराने गौरवण्यात आले. 
ऑल इंडिया मिक्स मार्शल आर्ट एसोसिएशनचे संस्थापक डेनियल सोलोमन इसाक यांनी
मिक्स मार्शल अँक्टच्या परीक्षक, सामनाधिकारी यांचा दिल्लीतील ताज पैलेस हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.  देशाच्या विविध राज्यातून एमएमए क्षेत्रातील प्रशिक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुंब्रा कौसा येथून उपस्थित राहिलेल्या याकूब खान यांना एआयएमएमएए च्या राष्ट्रीय आयुक्त लावरेले तानिया इसाक यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन याकूब खान यांचा सत्कार करण्यात आला. 
प्रशिक्षक म्हणून खान यांनी 9 राज्यात जावून 
मुलांना प्रशिक्षण दिले आहे.  देशभरातील सुमारे एक हजार पेक्षा अधिक मुलांना खान यांनी मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले आहे. 
स्पोर्टस एमएमएच्या क्षेत्रात याकूब खान यांनी केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील आपले नाव गाजवले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही