अभिनेत्री जिया खान आत्महत्या, सूरज पांचोली निर्दोष मुक्त

 


अभिनेत्री जिया खान आत्महत्या, सूरज पांचोली निर्दोष मुक्त

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी हा निकाल दिला. 



३ जून २०१३ रोजी जिया खान हिचा मृतदेह तिच्या घरात सापडला होता. तिची आई राबिया खान यांनी  मुलीच्या आत्महत्येबाबत सूरज पांचोलीला जबाबदार धरले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पांचोलीविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. 



१० वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. पुराव्यांअभावी सूरज पांचोलीला निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब