राहुल गांधी यांचा अर्ज सूरत न्यायालयाने फेटाळला, उच्च न्यायालयात दाद मागणार

राहुल गांधी यांचा अर्ज सूरत न्यायालयाने फेटाळला, उच्च न्यायालयात दाद मागणार

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे शिक्षा दिल्याच्या विरोधात गांधी यांनी सूरत न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे गांधी यांना आता उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.  मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर खटला चालून त्यांना दोन वर्षांची शिक्षा मिळाली आहे. 

त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 

२०१९ मध्ये केलेल्या वक्तव्याबाबत शिक्षा ठोठावण्याच्या विरोधात सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसतर्फे देण्यात आली आहे. या प्रकरणी १३ 

एप्रिल रोजी सुनावणी झाली होती व २० एप्रिलपर्यंत निर्णय राखून ठेवण्यात आला होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही