राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह तीन पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह तीन पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. या तीन पक्षांमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, ममता बॅनर्जीमंच्या अध्यक्षतेखालील तृणमुल कॉग्रेस पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा समावेश आहे. तर, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

या पक्षांना राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सूचना दिली होती व आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर या पक्षांतर्फे आपापली बाजू मांडण्यात आली मात्र त्यानंतरही निवडणूक आयोगाचे समाधान झाले नसल्याने या तीन पक्षांना आपला राष्ट्रीय दर्जा गमवावा लागला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, तृणमुल कॉंग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही