मुंबा कौसा येथील इफ्तार मोठ्या उत्साहात साजरा

 मुंबा कौसा येथील इफ्तार मोठ्या उत्साहात साजरा


लोकमानस प्रतिनिधी

मुंब्रा - मुंबा कौसा येथे आयोजित करण्यात आलेला रोजा इफ्तार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एस. के. रेसिडेन्सी समोरील या इफ्तारला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सगीर राजू अन्सारी यांच्यातर्फे या इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी इफ्तारची वेळ झाल्यानंतर नागरिकांनी रोजा सोडला व इफ्तार केला. यावेळी मौलानांनी प्रार्थना केली. मुंब्रा कौसा परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, समाजवादी पक्षाचे आदिल खान आझमी, बिल्डर शब्बीर खान, अझिम शेख, माजी नगरसेवक जफर नोमाणी, एमआयएमचे मुंब्रा अध्यक्ष सैफ पठाण यांनी या इफ्तारला हजेरी लावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब