कोकण बॅंकेचे संचालक मंडळ बिनविरोध विजयी, नजीब मुल्ला व आसिफ दादन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवर विश्वास

 कोकण बॅंकेचे संचालक मंडळ बिनविरोध विजयी, 

 नजीब मुल्ला व आसिफ दादन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवर विश्वास 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - 

कोकण मर्कंटाईल को- ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (कोकण बॅंक) संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. २०२३ ते २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे. 

या निवडणुकीसाठी १६ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात असल्याने संचालक मंडळ बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी देखील बिनविरोध निवड झाली होती. कोकण बॅंकेचे अध्यक्ष नजीब मुल्ला व उपाध्यक्ष आसिफ दादन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांबाबत विश्वास ठेवत निवडणूक बिनविरोध झाल्याने मुल्ला व दादन यांनी याबाबत सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत. 

१९६९ मध्ये स्थापन झालेल्या या बॅंकेला २०१९ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. सध्या २५ शाखांच्या माध्यमातून बॅंकेचे काम सुरु आहे. बॅंकेचे ५४ हजार सभासद असून दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे.  

 सन २०२३- २८ या कालावधी करिता नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे - नजीब मुल्ला ,आसिफ दादन, डॉ. शाहिद बरमारे,असगर डबीर,दिलीप मुजावर,बशीर मुर्तुझा, अल्ताफ काझी, ॲड. तसनीम काझी, फरीदा काझी, ॲड. मकबूल सुर्वे, डॉ. साजिद अधिकारी, फरहान वलाले ,मिलिंद कडलक, मोहम्मद नावेद रोगे, अब्दुल रशीद शेख, समीर मुल्ला

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब