मुंब्रा ते पनवेल बस सुरु करा, मुंब्रा प्रवासी संघाची मागणी

मुंब्रा ते पनवेल बस सुरु करा, मुंब्रा प्रवासी संघाची मागणी 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंब्रा 

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची वातानुकुलित बस मुंब्रा ते पनवेल व मुंब्रा ते मीरा रोड या मार्गावर सुरु करण्याची मागणी मुंब्रावासीयांकडून करण्यात आली आहे.  मुंब्रा प्रवासी संघातर्फे ही मागणी ठाणे परिवहन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्याकडे करण्यात आली आहे. 


मुंब्रा कौसा परिसरातील टीएमटीचे बस थांबे अत्याधुनिक पध्दतीचे करण्यात यावेत, या बसथांब्यासमोर करण्यात येणाऱ्या पार्किंग विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, बस थांब्यावर बस सेवेचे वेळापत्रक लावण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

यावेळी  अब्दुल्ला पठाण,  रफिक शेख, अन्वारुल खान उपस्थित होते. रमजान कालावधीत मुंब्रा स्थानक ते भारत गिअर पर्यंत विशेष बस सेवा सुरु केल्याबद्दल यावेळी प्रवासी संघातर्फे शमीम खान यांचा सत्कार करण्यात आला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब