वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मर्जिया पठाण मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मर्जिया पठाण मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर
लोकमानस प्रतिनिधी
प्रतिनिधी

मुंबा - रमजान महिन्यात मुंब्रा मधील वाहतूक कोंडीत वाढ होते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी  मर्जिया पठाण मध्यरात्री दोन अडीच वाजेपर्यंत रस्त्यावर उभी राहुन वाहतूक कोंडी सोडवत आहे. त्यामध्ये सुमारे ३० स्वयंसेवकांचे त्यांना सहकार्य मिळत आहे. ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांची ती कन्या आहे. 


मुंबा हे माझे शहर असल्याने या शहराची जबाबदारी देखील माझी आहे. या शिकवणीप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून मर्जिया पठाण सातत्याने दर रमजान महिन्यात हे काम करत आहे. मुंब्रा कौसा शहरातून जाणारा मुख्य मार्ग हा जुना मुंबई पुणे महामार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच मोठी गर्दी असते. रमजान महिन्यात या ठिकाणी खाण्यापिण्याच्या वस्तूंचे स्टॉल लावले जातात. अमृत नगर परिसरात असलेल्या गुलाब पार्क मार्केटमध्ये रमजानमध्ये खरेदीसाठी मुंब्रा कौसा परिसरातून व इतर परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असते.

मुंब्रा बायपास रस्त्याची डागडुजी करण्यासाठी हा मार्ग बंद असल्याने त्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण देखील या मुख्य रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मर्जिया आपल्या स्वयंसेवकांसह या कामात व्यस्त झाली आहे.

याबाबत मर्जिया पठाण यांनी सांगितले, मुंबा शहरातील मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला पूर्ण बाजारपेठ असल्याने व रमजान महिन्यात या रस्त्यावरील वाहतूकीत मोठी वाढ होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडे कमी मनुष्यबळ असल्याने त्यांना सहाय्य करण्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून हे काम करत आहोत.

मुंब्रा पोलिस, वाहतूक पोलिस वाहतूक कोंडी हटवण्यासाठी कार्यरत
मुंब्रा पोलिसांनी या परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी दारुल फलाह मशीदीसमोरील रस्त्यावर वाहतूक नियंत्रण कक्ष व टेहळणी कक्ष सुरु केला आहे. मुंब्रा पोलिसांचे निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी याठिकाणी मध्यरात्रीपर्यंत उपस्थित राहून आपले कर्तव्य पूर्ण करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही