सलामती पीर यांचा उर्स देहुरोड येथे संपन्न

सलामती पीर यांचा उर्स देहुरोड येथे संपन्न

मुंबई - 

हजरत सुफी ख्वाजा शेख आलमगीर शाह काद्री अल चिश्ती इफ्तेखारी (सलामती पीर) यांचा उर्स देहूरोड येथे नुकताच संपन्न झाला. ऊर्सचे यंदाचे ११ वे वर्ष होते.या उर्ससाठी मोठी गर्दी झाली होती. 

माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार अमर साबळे, गुजरातचे मंत्री जितूभाई वाघेला, मुफ्ती मंजूर जियाई, अभिनेता रझा मुराद, अली खान, सिकंदर खान यांच्यासहित विविध मान्यवरांनी उर्समध्ये सहभाग घेतला. 



ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष मौलाना मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया) यांनी दुआ केली. सलामती पीर यांचे सुपुत्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. राज्याच्या विविध भागातून मौलाना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावेळी उपस्थित राहून सलामती पीर यांना अभिवादन केले. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही