दाऊदी बोहरा समाजाची रात्रभर जागून प्रार्थना, धर्मगुरुंचा वाढदिवस साजरा


दाऊदी बोहरा समाजाची रात्रभर जागून प्रार्थना, 
धर्मगुरुंचा वाढदिवस साजरा

सारा पुरी- मुंब्रा
 दाऊदी बोहरा समाजाचे ५३वे धर्मगुरू अली कादर मुफद्दल मौला यांचा ८० वा वाढदिवस मुंब्रा येथे साजरा करण्यात आला. आनंद कोळीवाडा येथील अल बुरहानी मशिदीत लैलतुल कद्रच्या रात्री दाऊदी बोहरा समाजाने  रात्रभर जागून प्रार्थना केली.
बोहरा समाज रमजान महिन्यातील 23वी रात्र लैलतुल कदर (शबे कद्र) म्हणून साजरी करतो, दोन दिवस आधीपासून या रात्रीची तयारी समाजात सुरू करण्यात आली होती.  
जगभरात पवित्र रमजान महिना सुरू असून, रमजान महिना संपताच जगभरात ईद मुबारकचा सण साजरा होणार आहे.
रमजान महिन्यात अशीही एक रात्र आहे जी ईश्वराने हजारो रात्रींपेक्षा चांगली बनवली आहे, या रात्रीलाच शब-ए-कद्रची रात्र म्हटले जाते, जी सर्वात मोठी रात्र आहे. 
 बोहरा समाजाने नातेवाईक, मित्र आणि शेजारी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.  माजी नगरसेवक राजन किणे यांनीही फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सय्यदना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छा संदेश दिले.
समाजाचे सदस्य शब्बीरभाई मकासर यांनी सांगितले की, प्रार्थनेची प्रक्रिया मगरीबच्या नमाजानंतर सुरू झाली आणि सूर्योदयापर्यंत चालू राहिली, नमाज दरम्यान, बोहरा समाजाच्या 51व्या धर्मगुरुंचे ऑडिओ रिले आणि 52 आणि 53 व्या गुरुंचे व्हिडिओ रिले रेकॉर्डिंग प्रसारित केले गेले.
हुसेन यांच्या हौतात्म्याचे वाचन करून मनःपूर्वक शोक व्यक्त करत सय्यदना साहेब यांनी संपूर्ण जगातील मानवजातीसाठी देशात शांतता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी प्रार्थना केली.
बोहरा समाजाने रात्रभर पूजा केली आणि धार्मिक नेते मौलाना अली कदर सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहिब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तसेच अनेक लोक हातात तस्बीह घेऊन अम्मतच्या आई साहेबा बीबी फातेमा (स.) यांचे स्मरण करत होते.
दाऊदी बोहरा समाज मुंब्रा चे जेष्ठ सदस्य अमील शेख, गुलाम अब्बास भाई व शेख मुस्तुफाभाई इंदोरेवाला यांच्यासह शेकडो बोहरा समाज बांधव व लहान मुलांनी केक कापला. त्यामध्ये बोहरा समाजाचे लोक सहभागी झाले होते. याावेळी मुफद्दल मौला जिंदाबाद च्या घोषणांनी व धार्मिक नेते मौलाना अलिकदर यांच्या घोषणा देण्यात आल्या. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही