टोरंट पॉवरतर्फे शिळ-मुंब्रा-कळवा नागरिकांसाठीदावत-ए-इफ्तार

टोरंट पॉवरतर्फे शिळ-मुंब्रा-कळवा नागरिकांसाठी दावत-ए-इफ्तार
लोकमानस प्रतिनिधी 
 शिळ-मुंब्रा-कळवा नागरिकांसाठी टोरंट पॉवरतर्फे डायमंड बॅँकवे हॉल - कौसा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी,  राजकीय पदाधिकारी,  पत्रकार व  प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
टोरंट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुधीर देशमुख, जीवन क्लार्क, जय पंड्या, चेतन बदियानी यांसह  टोरंट टीमने सर्व पाहुण्यांचे  स्वागत केले.

 मुफ्ती सय्यद फैझ यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान आणि इफ्तारचे महत्त्व समजावून सांगितले. पाहुण्यांनी टोरेंट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक केले आणि सांगितले की अशा कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता आणि एकोपा निर्माण होण्यास मदत होते.  सोमवारी भिवंडीतील नागरिकांसाठी देखील कंपनी द्वारे इफ्तार  कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता अशी माहिती 
जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब