मोंड ग्रामस्थ विकास मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मोंड ग्रामस्थ विकास मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी 
मुंबई
मोंड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबईला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. दादर येथील शिवाजी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला मोंड ग्रामस्थांनी व मंडळाच्या हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. चाळीस वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थांसाठी कार्यरत असणे हे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे काम असून ग्रामस्थांना देखील त्याची जाणिव असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विशेष पाहुणे म्हणून मोहन गोरे उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष शरद कुळकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मोंड ग्रामस्थ विकास मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीची त्यांनी यावेळी माहिती दिली. संस्था चालवणे किती जिकीरीचे व आव्हानात्मक काम आहे. त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी, समस्या उद्भवतात त्याबाबत कुळकर्णी यांनी माहिती दिली. गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेली संस्थेची ही घोडदौड कितीही अडथळे आले तरी भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

संस्थेचे माजी सचिव  नारायण साटम -शेवरेकर तसेच लवू दुसनकर यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल  पद्मश्री  मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेला २०१५ नंतर देणगी देणाऱ्या देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 
यावेळी गावाची माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. सर्वांनी  मनोरंजनासाठी वाकडी तिकडी हे  विनोदी नाटक यावेळी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सचिव प्रकाश अनभवणे यांनी सूत्रसंचलन तर उपाध्यक्ष सुभाष अनभवणे यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मंगेश व दिलीप माणगावकर, शामसुंदर मुणगेकर,  ॲड. गणपत मोंडे, उमेश टुकरल, रवींद्र घाडी सचिन पुजारे, महादेव झरकर, मेघा नाटेकर यांच्यासह इतरांनीही सहकार्य केले.
मंडळाच्या आवाहनास ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्यास शाळेची उर्वरित कामे लवकर पूर्ण करणे शक्य  होईल व मुलांना आनंददायी शिक्षण घेता येईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही