पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टिळक नगर परिसराची स्वच्छता दहा दिवसाच्या आत करा: - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

इमेज
  टिळक नगर परिसराची स्वच्छता दहा दिवसाच्या आत करा: - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश                                    मुंबई : चेंबूर येथील  खुल्या मैदानाची देखरेख करावी आणि बिल्डिंग ९२ ते १११ टिळक नगर परिसराची  मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दहा  दिवसाच्या आत   स्वच्छता करावी,असे  निर्देश  मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी   दिले.          एम वेस्ट वॉर्ड,चेंबूर येथे  पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार प्रकाश फार्तेपकर,  सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   चेंबूर येथील अक्षय चव्हाण यांनी खुल्या मैदानाची देखरेख व बिल्डिंग ९२ ते १११ टिळक नगर परिसराची स्वच्छता  करण्यात यावी अशी तक्रार केली होती.याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दहा  दिवसाच्या आत, परिसराची स्वच्छता करण्यात यावी असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.          हामसा सोसायटी, पेस्टम सागर येथील लक्ष्मीशहा सालीयन यांनी जिल्हाधिकारी यांच्या अखत

महानगरपालिका अंतर्गत सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

महानगरपालिका अंतर्गत सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या , संपादित केलेल्या भाडेतत्वावरील निवासी  तसेच अनिवासी गाळेधारकांच्या  मालमत्तांचे भाडे परिगणनाबाबत, हस्तांतरण शुल्क, अनामत रक्कम याबाबत  सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती मिळाली असून मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रश्नाबाबत सातत्याने केलेल्या  पाठपुराव्यामुळे हे  यश मिळाले आहे.        बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येणा-या सर्व वसाहती ची भाडेतत्वावरील निवासी तसेच  अनिवासी मालमत्तांच्या भाडे परिगणना व हस्तांतर शुल्क तसेच अनामत रक्कम यात शिवसेनेच्या सरकारने  मोठी वाढ  केली होती.हा निर्णय कोणाला समजणार नाही असे तत्कालीन सरकार असलेल्या शिवसेनेला वाटले होते.मात्र निवडणुका पुढे गेल्यामुळे हा निर्णय लोकांना समजला.ही दर वाढ अन्याय कारक आहे. ही दरवाढ  रद्द व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां

मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

इमेज
  मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश मुंबई – मुंबई विमानतळावर अम्मा प्रा. लि. कंपनीत  कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये पगारवाढ व इतर सुविधा वाढवून मिळाल्या आहेत. भारतीय कामगार सेनेच्या विमानतळ युनिटच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.   २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी कामगारांना आठ हजार रुपये पगारवाढ,प्रति महिना ७०० रुपये वैद्यकीय भत्ता, मोबाईल रिचार्ज साठी १५० रुपये, डीए व बोनस मिळणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,   भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस आमदार सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त चिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली आहे. यावेळी मुंबई विमानतळ प्रशासनाचे कर्मचारी महाव्यवस्थापक राजेश म्हात्रे, श्रीकांत पवार, अम्माचे एमडी  समीर पटेल, सुधीर जगदाळे, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे, सुर्यकांत पाटील, सहचिटणीस मिलींद तावडे उपस्थित होते.

अर्धे रेशन कीट देण्यास रेशन दुकानदारांचा विरोध

  अर्धे रेशन कीट देण्यास रेशन दुकानदारांचा विरोध   प्रतिनिधी   मुंबई – दिवाळी संपली तरी राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अनेक नागरिकांर्यंत पोचला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.   काही ठिकाणी साखर १ किलो, १ किलो चणाडाळ, १ किलो रवा व १ लिटर गोडे तेल या वस्तुंचा समावेश असलेले कीट वाटप करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी शिधा कीट मधील काही वस्तू   अद्याप पोहोचले नसल्याने ज्या वस्तू आल्या आहेत त्या वाटप करण्याचे तोंडी आदेश रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र अर्धवट कीट देण्यास रेशन दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे.   मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रेशन दुकानदारांना सरकारच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत रविवारी देखील रेशन वाटप करण्यासाठी दुकाने उघडी ठेवावी लागली. मात्र सर्व कीट उपलब्ध न झाल्याने अद्याप सर्वांना हे कीट देणे शक्य झाले नाही. आता अर्धवट कीट देण्यावरुन ग्राहकांच्या संतापाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. रेशन दुकानदारांनी अर्धे कीट वाटप करु नये, असे आवाहन नवीन मारु यांनी रे

जनजागृती व सतर्कता हाच स्तनाच्या कर्करोगापासून बचावाचा मार्ग- डॉ. उम्मेहानी

  जनजागृती व सतर्कता हाच स्तनाच्या कर्करोगापासून बचावाचा मार्ग-   डॉ. उम्मेहानी लोकमानस प्रतिनिधी   मुंब्रा - स्तनाच्या कर्करोगापासून बचावासाठी सतर्कता हाच महत्त्वाचा उपाय असल्याचे मत डॉ. उम्मेहानी यांनी व्यक्त केले. ऑक्टोबर महिना स्तन कर्करोगाबाबत जागृतीचा महिना- गुलाबी महिना म्हणून ओळखला जातो.   जगभरात स्तन कर्करोगाबाबत जागृती केली जाते. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आजाराबाबत माहिती मिळाल्यावर त्यावरील उपचार सुरु करता येतात, त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्यास कर्करोगाला प्रतिबंध करता येतो. स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी गुलाबी रिबन या प्रतिकाचा वापर केला जातो. सध्या स्तनाच्या कर्करोगावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने जागरुकता व वेळेवर उपचार सुरु करणे हाच उपाय आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे व त्यावरील उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंब्रा येथे दाऊदी बोहरा समाजातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उमूर सहिया संघटना व सैफी रुग्णालयातर्फे आयोजित या शिबिरात डॉ. उम्मेहानी यांनी महिलांची तपासणी केली. आनंद कोळीवाडा येथील अल बुऱ्हानी सभागृहात या शिबिराचे

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रतिनिधी मुंबई- राज्यातील पोलिस अधीक्षक- पोलिस उपायुक्त दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या गुरुवारी करण्यात आल्या.  पुढीलप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत. धनंजय कुलकर्णी -पोलिस अधीक्षक रत्नागिरी पवन बनसोड- सिंधुदूर्ग, बसवराज तेली-सांगली,समीर शेख-सातारा, अंकित गोयल-पुणे ग्रामिण शिरीष एल. सरदेशपांडे- सोलापूर ग्रामिण,राकेश ओला- अहमदनगर, एम. राजकुमार- जळगाव,रामसुधा आर- परभणी, संदीप सिंह गिल-हिंगोली,श्रीकृष्ण कोकाटे -नांदेड, सोमय मुंडे- लातूर, सारंग आवाड-बुलढाणा,गौरव सिंह- यवतमाळ, संदीप घुगे- अकोला, रविंद्रसिंग परदेशी-चंद्रपूर, नुरूल हसन- वर्धा,निखिल पिंगळे-गोंदिया, निलोत्पल- गडचिरोली, संजय ए. बारकुंड- धुळे,श्रीकांत परोपकारी- ठाणे पोलिस उपायुक्त, सचिन  पाटील पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग तर राज्य सेवेतील लक्ष्मीकांत पाटील पराग  मणेरे- उप आयुक्त, विशेष सुरक्षा विभाग मुंबई अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.  तसेच मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम,अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे,जयंत मीना

बेस्ट कामगारांना ६ ते ११ हजार एवढी वेतनवाढ, शुक्रवारी बोनस मिळणार

  बेस्ट कामगारांना ६ ते ११ हजार एवढी वेतनवाढ ,  शुक्रवारी बोनस मिळणार भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके यांची माहिती   लोकमानस प्रतिनिधी मुंबई - भाजपा बेस्ट कामगार संघाच्या प्रयत्नामुळे बेस्ट कामगारांसाठीच्या वेतन करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार असून दिवाळीचा बोनस २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके व सरचिटणीस गजानन नागे यांनी दिली आहे.   बेस्ट कामगारांसाठीचा २०१६ ते २१ चा करार नुकताच करण्यात आला असून त्यानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीही बेस्ट कामगारांना लागू झाल्या आहेत.   नव्या वेतनाची थकबाकी कामगारांना देण्यात येणार आहे.     या करारावर कामगार संघातर्फे गणेश हाके ,  गजानन नागे तर बेस्ट प्रशासनातर्फे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र ,  व्यवस्थापक र वींद्र शेट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.यावर्षीच्या दिवाळीसाठीचा बोनस शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या

देशात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही - खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टीका,इंडो अरब सोसायटी व इस्लाम जिमखाना तर्फे सिन्हा यांचा सत्कार

इमेज
देशात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही - खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टीका, इंडो अरब सोसायटी व इस्लाम जिमखाना तर्फे सिन्हा यांचा सत्कार प्रतिनिधी मुंबई – देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही आल्याची टीका  माजी केंद्रीय मंत्री, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरेल व भारतातील लोकशाहीला एक नवीन आयाम मिळेल व ही यात्रा परिवर्तन करेल असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला.  राजकारण वाईट असेल तर त्याला स्वच्छ करण्याची गरज आहे. चांगल्या व्यक्ती राजकारणात येण्यास तयार नसतील तर त्यांनी वाईट शासकांच्या प्रभावाखाली जगण्यास किंवा मरण्यास तयार राहण्याची गरज आहे, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले. अभिनेता म्हणून यशस्वी झाल्यानंतर समाजाप्रति असलेल्या जाणिवेतून आपण समाजकारणाकडे व राजकारणाकडे वळल्याचे ते म्हणाले. आपला आजपर्यंतचा प्रवास रसिकांच्या प्रेमामुळे झाला. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास, परिश्रम, समर्पण गरजेचे आहृ, असा सल्ला त्यांनी दिला. शत्रुघ्न सिन

भाजप उमेदवाराची माघार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

  भाजप उमेदवाराची माघार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा लोकमानस प्रतिनिधी मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल उमेदवारी मागे घेतील अशी माहिती त्यांनी दिली. रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपने या निवडणुकीतून माघार घ्यावी व ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी मागणी केली होती. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील अशीच मागणी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन याबाबत आवाहन केले होते.

दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा बसेस

दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा बसेस लोकमानस प्रतिनिधी             मुंबई :  दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.             २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे.             दरम्यान, एसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे.  तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ

एपीसीआर च्या प्रयत्नांनी मुहम्मद अल्ताफची तुरुंगातून सुटका

एपीसीआर च्या प्रयत्नांनी मुहम्मद अल्ताफची तुरुंगातून सुटका  लोकमानस प्रतिनिधी मुंबई  असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर)ने एका गरीब आणि पीडित व्यक्तीला रेल्वे दंडाधिकारी न्यायालय सीएसटीमधून सोडवले, त्याच्यातर्फे वकील म्हणून अँड शोएब इनामदार यांंनी काम पाहिले.  जामिनासाठी युक्तिवाद करताना ते म्हणाले की, मुहम्मद अल्ताफ हा सराईत गुन्हेगार नाही आणि त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी या घटनेतून कोणत्याही प्रकारची मालमत्ता जप्त केलेली नाही. फिर्यादी पक्ष अल्ताफला दोषी सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत.  एपीसीआर महाराष्ट्रीचे अध्यक्ष मोहम्मद अस्लम गाझी म्हणाले, त्यांना सिकंदराबाद येथून फोन आला की मुहम्मद अल्ताफला मुंबई पोलिसांनी अटक केली असून तो भायखळा कारागृहात आहे. त्याच्यावर कोणत्या गुन्ह्याचा आरोप आहे हे कळू शकलेले नाही. महंमद अल्ताफ हा सिकंदराबाद येथील घरातून भांडण करून रागाच्या भरात मुंबईत आला होता. त्याला सीएसटी रेल्वे पोलिसांनी सीएसटी मेन लाईन स्टेशन येथून अटक केली आणि चोरीच्या आरोपाखाली भायखळा कारागृहात पाठवले.   न्यायालयाकडून कागदपत्रे मिळवण्य

अन्वारुल हक खान यांचा महात्मा गांधी पुरस्काराने सन्मान

इमेज
अन्वारुल हक खान यांचा महात्मा गांधी पुरस्काराने सन्मान  लोकमानस प्रतिनिधी  ठाणे-  पत्रकार अन्वारुल हक खान यांना महात्मा गांधी पीस पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. नँशनल ह्युमन राईटस अँन्ड ह्युमनेटिरियन फाऊंडेशनतर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.  कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मुंबईचे रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या हस्ते भिवंडी येथे झालेल्या कार्यक्रमात अन्वारुल हक खान यांचा सत्कार करण्यात आला. ऊर्दू वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. यावेळी पत्रकार इक्बाल अंसारी यांचा देखील पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  यावेळी शब्बीर खान, अझीम शेख, सय्यद जाहीद, इम्रान फरीद, रईस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जिया ऊर रहमान अंसारी, उप प्राचार्य अमीर सिद्दीकी, मुखलिस मदू, अब्दुल अजीज अंसारी उपस्थित होते. 

औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हेंबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा

औरंगाबादमध्ये ५ व ६ नोव्हेंबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धा लोकमानस प्रतिनिधी मुंबई -   कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन ५ व ६ नोव्हेंबर २०२२ रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबादच्या  येथे करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी दिली आहे. सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाडू महाराष्ट्राला ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी  तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद, २०२२ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.  तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आप आपापल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर  खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करावी असे त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना आवाहन या माध्यमातून केले आहे. ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन (CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन (SAKF), वर्ल्ड कराटे

राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करणार, पदनिर्मितीसही मान्यता

राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करणार, पदनिर्मितीसही मान्यता लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.    रायगड-अलिबाग जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येऊन २० पदांना मान्यता देण्यात येत आहे.  यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च येईल.  नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल.  यासाठी १४ नियमित पदे व एक पद बाह्य यंत्रणेद्धारे भरण्यात येईल.   नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी २० पदांना मान्यता देण्यात आली आहे.  याकरिता ९८ लाख ८३ हजार ७२४ इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, बेलापूर हे  जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालय त्याचप्रमाणे बेलापूर येथेच जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता देण्यात

बाळासाहेबांची शिवसेना' एकनाथ शिंदेकडे, तर मशाल चिन्हासह 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ठाकरे गटाकडे

बाळासाहेबांची शिवसेना' एकनाथ शिंदेकडे,  तर मशाल चिन्हासह 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ठाकरे गटाकडे लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  निवडणूक आयोगाने 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे तर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे. उध्दव ठाकरे यांच्या गटाला  मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने चिन्हासाठी दिलेले तीन पर्याय फेटाळण्यात आले आहेत त्यामुळे त्यांना चिन्हासाठी नवीन पर्याय देण्यास सांगण्यात आले आहे.   शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा नवीन निर्णय घेतला आहे. धनुष्यबाण व शिवसेना हातातून निसटलेल्या उध्दव ठाकरेंना आता नवीन नाव व नवीन चिन्ह घेऊन लोकांमध्ये जावे लागणार आहे. 

मुलायम सिंग यादव यांचे निधन

इमेज
  मुलायम सिंग यादव यांचे निधन   लोकमानस प्रतिनिधी मुंबई – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मुलायमसिंह यांच्या निधनाने उत्तरप्रदेशच्या राजकारणातील एक पर्व संपुष्टात आले आहे. २२ नोव्हेंबर १९३९ ला सैफई गावात त्यांचा जन्म झाला होता.   उत्तरप्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. त्याशिवाय केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.     उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.     मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते.   व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संस

कुर्ला परिसरात अंमली पदार्थ विक्री जोरात, पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

कुर्ला परिसरात अंमली पदार्थ विक्री जोरात,  पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुंबई -:    कुर्ला येथे अंमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात अंमली पदार्थ विक्रीमुळे तरुणाई त्याच्या विळख्यात सापडली आहे.  या परिसरात ड्रग्ज माफियांनी आपले बस्तान मांडले असून राजरोजपणे अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे.  ड्रग्ज माफियांची नावे व विक्रीच्या अड्ड्यांसह अनेक तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड. कमलेश हडकर यांनी केला आहे.       अँड हडकर यांनी मागील दोन वर्षांपासून कुर्ला परिसरातील ड्रग्ज माफिया व जुगाराच्या अड्ड्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांपासून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  मात्र त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  हडकर म्हणाले, कुर्ला परिसर सध्या उडता पंजाब झाला असून अंमली पदार्थ विक्रीचे माहेरघर या ठिकाणी बनले आहे. कुर्ल्यातील अनेक झोपडपट्टी भागात अंमली पदार्थ विक्रीचे अड्डे असून मुंबईच्या अनेक भागातून नशेडी खरेदीसाठी येतात. या ठिकाणचा तरुण पूर्णतः व्यसनाच्

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले, शिवसेना नाव वापरण्यास मनाई

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले, शिवसेना नाव वापरण्यास मनाई , शिंदे व ठाकरे गटाला धक्का  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने तात्पुरते गोठवले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे  आणि एकनाथ शिंदे यांच्या लढाईत दोन्ही गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे  शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गट हे चिन्ह वापरु शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने घेतलेला हा  निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. शिवसेना हे नाव देखील वापरु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.   अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या चिन्हासाठी 10 ऑक्टोबर पर्यंत दावा करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

नाशिक मध्ये भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू

नाशिक मध्ये भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू लोकमानस प्रतिनिधी  नाशिक - नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.  या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.   अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील  मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार,विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोपनिविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा  भ्रष्टाचार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप,  निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी मुंबई - सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून  या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.     या पॅकेजसाठी एक रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावे आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी दानवे यांनी केली.     ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोरगरीब जनतेला रेशन दुकानांच्या माध्यमातून दिवाळी फूड किट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त फूड किट  ( चना डाळ, रवा, साखर व पामतेल) पुरवठा करणे या योजनेसाठी N

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उध्दव ठाकरेंना जाहीर पत्र

इमेज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उध्दव ठाकरेंना जाहीर पत्र लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  त्यांचे पुत्र  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांश याचा उल्लेख करत टीका केली. त्या टीकेने व्यथित झालेल्या खासदार शिंदे यांनी पिता म्हणून उध्दव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे... माननीय श्री. उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र. काल विजयादशमी झाली. या नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस सारा महाराष्ट्र आदिशक्तीचा जागर करीत होता. तिच्या शक्ती आणि भक्तीचे पोवाडे गात होता आणि तिच्याकडेच आशीर्वादही मागत होता. कालचा दिवस म्हणजे नऊ दिवसांच्या आनंदाच्या माळेनंतरची सोन्याची माळ. हा दिवस सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा आणि आनंद लुटण्याचा. मात्र काल उभ्या महाराष्ट्रानं काय पाहिलं? काय ऐकलं?  महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित

कझाकस्थानमध्ये आता भारतीयांना व्हिजा शिवाय प्रवेश; मुंबई येथे वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत विचार

इमेज
  कझाकस्थानमध्ये आता भारतीयांना व्हिजा शिवाय प्रवेश; मुंबई येथे वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत विचार  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  मध्य आशियातील प्रमुख देश असलेल्या कझाकस्थानने भारतीयांकरिता व्हि सा मुक्त प्रवेश धोरण स्वीकारले असून भारतीय पर्यटकांना कझाकस्थानला १४ दिवसांपर्यंत व्हिजा शिवाय भेट देता येणार असल्याचे कझाकस्थान गणराज्याचे भारतातील राजदूत नूरलान झालगसबायेव्ह यांनी सांगितले. कझाकस्थान मुंबई येथे आपले स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत देखील विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.    कझाकस्थानच्या राजदूतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  भारत - कझाकस्थान राजनैयिक संबंध प्रस्थापित होण्यास ३० वर्षे झाली असून येत्या जानेवारी महिन्यात कझाकस्थानचे राष्ट्राध्यक्ष कासिम जोमर्त टोकाएव्ह भारत भेटीवर येणार आहेत. शांघाय सहकार्य संस्थेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून संस्थेची पुढील शिखर परिषद भारतात होणार आहे. या बैठकीच्या वेळी कझाकस्थानच्या अध्यक्षांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्राला देखील भेट द्यावी तसेच त्यावेळी मुंबई येथे कझाक - भारत

नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म 'बझफ्लिक्स' ची दणक्यात सुरूवात

इमेज
 नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म 'बझफ्लिक्स' ची दणक्यात सुरूवात, ३ नव्या वेबसिरीज आणि १०० चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध कुटुंबासह पाहता येतील अशा मालिका आणि चित्रपट 'बझफ्लिक्स'वर पाहता येणार  प्रतिनिधी, मुंबई-    देशातील आगळावेगळा आणि नवा कोरा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेला बझफ्लिक्स (Buzzflix) प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे यावरील मालिका, चित्रपट हे संपूर्ण कुटुंबासह पाहता येतील.  दिमाखदारपणे बझफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचा उद्धाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टी तसंच मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.  निर्माता आणि दिग्दर्शक आनंद पंडित, फॅशन डिझायनर अर्चना कोचर, अभिनेत्री मौली गांगुली, मराठी अभिनेता विजय पाटकर, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, अभिनेता कंवलजीत पेंटल, रोडीजची विजेती आणि अभिनेत्री श्वेता मेहता आणि हास्यकलाकार सुनील पाल यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती.  बझफ्लिक्सवर मराठी अभिनेते विजय पाटकर यांची भूमिका असलेली शांताराम VS मेनी ( Shantaram VS Many) ही वेबसिरीज लाँच करण्यात आली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर प्रतिनिधी मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या ११ महिन्यांपासून ते कोठडीत होते. ईडी ने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्याच्या आत निर्णय देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. १०० कोटी रुपये खंडणी वसूली प्रकरणी आरोप झाल्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते आत होते. मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमवीर सिंह व बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना कथितरित्या १०० कोटी खंडणी वसूलीचे आदेश दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.  १ लाख रुपयांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आला आहे.  देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप सुनावणी सुरु आहे. त्यामुळे तोपर्यंत देशमुख तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. ईडी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. 

ईद मिलाद मिरवणूक, डीजे वर खर्च होणारा पैसा गरीबांच्या शिक्षणासाठी, अन्नासाठी खर्च करा, मौलाना मौईनुद्दीन अश्रफ यांचे आवाहन

इमेज
ईद मिलाद मिरवणूक, डीजे वर खर्च होणारा पैसा गरीबांच्या शिक्षणासाठी, अन्नासाठी खर्च करा, मौलाना मौईनुद्दीन अश्रफ यांचे आवाहन प्रतिनिधी मुंबई- प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या  ईद मिलादच्या मिरवणुकीत डीजे वाजवू नये व त्यासाठी होणारा खर्च गरीबांच्या शिक्षणासाठी व इतर समाजोपयोगी कार्यासाठी वापरावा, असे आवाहन मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांनी केले. ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा कौसा परिसरातील मौलाना, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी, यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आले होते.  ईद मिलादच्या मिरवणुकीत काय करावे, काय टाळावे याबाबत विचारविमर्श करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ईद मिलादच्या वेळी डीजे लावणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पोलिसांची भेट घेईल, असे त्यांनी जाहीर केले.         प्रेषितांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या ईद मिलाद मध्ये मोठ्या प्रमाणात दानधर्म करावा, डीजे, इतर गाणी लावू नयेत,  व जास्तीत जास्त सामाजिक कार्यावर भर द्यावा, असे या बैठकीत ठरवण्यात आले. यावेळी मौलाना अश्र