भाजप उमेदवाराची माघार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

 

भाजप उमेदवाराची माघार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल उमेदवारी मागे घेतील अशी माहिती त्यांनी दिली. रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपने या निवडणुकीतून माघार घ्यावी व ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी मागणी केली होती. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील अशीच मागणी केली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन याबाबत आवाहन केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब