जनजागृती व सतर्कता हाच स्तनाच्या कर्करोगापासून बचावाचा मार्ग- डॉ. उम्मेहानी

 

जनजागृती व सतर्कता हाच स्तनाच्या कर्करोगापासून बचावाचा मार्ग-  डॉ. उम्मेहानी

लोकमानस प्रतिनिधी  

मुंब्रा -

स्तनाच्या कर्करोगापासून बचावासाठी सतर्कता हाच महत्त्वाचा उपाय असल्याचे मत डॉ. उम्मेहानी यांनी व्यक्त केले. ऑक्टोबर महिना स्तन कर्करोगाबाबत जागृतीचा महिना- गुलाबी महिना म्हणून ओळखला जातो.

 

जगभरात स्तन कर्करोगाबाबत जागृती केली जाते. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आजाराबाबत माहिती मिळाल्यावर त्यावरील उपचार सुरु करता येतात, त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्यास कर्करोगाला प्रतिबंध करता येतो. स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी गुलाबी रिबन या प्रतिकाचा वापर केला जातो.

सध्या स्तनाच्या कर्करोगावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने जागरुकता व वेळेवर उपचार सुरु करणे हाच उपाय आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे व त्यावरील उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंब्रा येथे दाऊदी बोहरा समाजातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उमूर सहिया संघटना व सैफी रुग्णालयातर्फे आयोजित या शिबिरात डॉ. उम्मेहानी यांनी महिलांची तपासणी केली. आनंद कोळीवाडा येथील अल बुऱ्हानी सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित महिलांना यावेळी स्तनाच्या कर्करोगाबाबत माहिती देण्यात आली. उमूर सहियाचे अध्यक्षा शमीना इंदोरवाला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणियरित्या वाढले आहे. विविध वयोगटातील महिला या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र अनेकदा संकोचामुळे महिला आपली समस्या सांगण्याऐवजी लपवण्यास प्राधान्य देतात व दुर्दैवाने त्याचा वाईट परिणाम होऊन रोग पुढील टप्प्यात जातो व उपचार करणे जिकीरीचे होते त्यामुळे योग्य वेळी या रोगाबाबत माहिती मिळणे व त्यावर त्वरित उपचार सुरु करण्याची गरज असते. त्यामुळे महिलांनी न लाजता यावर सल्ला घेऊन त्वरित उपचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी जाहाबिया इंदौरवाला, अल्फिया इलेक्ट्रिकवाला,सकिना मोरबी वाला, बतुल पाटनवाला व इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही