मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

 

मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई – मुंबई विमानतळावर अम्मा प्रा. लि. कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये पगारवाढ व इतर सुविधा वाढवून मिळाल्या आहेत. भारतीय कामगार सेनेच्या विमानतळ युनिटच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.


 २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी कामगारांना आठ हजार रुपये पगारवाढ,प्रति महिना ७०० रुपये वैद्यकीय भत्ता, मोबाईल रिचार्ज साठी १५० रुपये, डीए व बोनस मिळणार आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,  भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस आमदार सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त चिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली आहे.

यावेळी मुंबई विमानतळ प्रशासनाचे कर्मचारी महाव्यवस्थापक राजेश म्हात्रे, श्रीकांत पवार, अम्माचे एमडी समीर पटेल, सुधीर जगदाळे, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे, सुर्यकांत पाटील, सहचिटणीस मिलींद तावडे उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब