बेस्ट कामगारांना ६ ते ११ हजार एवढी वेतनवाढ, शुक्रवारी बोनस मिळणार

 

बेस्ट कामगारांना ६ ते ११ हजार एवढी वेतनवाढशुक्रवारी बोनस मिळणार

भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके यांची माहिती

 लोकमानस प्रतिनिधी

मुंबई -

भाजपा बेस्ट कामगार संघाच्या प्रयत्नामुळे बेस्ट कामगारांसाठीच्या वेतन करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार असून दिवाळीचा बोनस २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके व सरचिटणीस गजानन नागे यांनी दिली आहे.

 बेस्ट कामगारांसाठीचा २०१६ ते २१ चा करार नुकताच करण्यात आला असून त्यानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीही बेस्ट कामगारांना लागू झाल्या आहेत.  नव्या वेतनाची थकबाकी कामगारांना देण्यात येणार आहे. 

 

या करारावर कामगार संघातर्फे गणेश हाकेगजानन नागे तर बेस्ट प्रशासनातर्फे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रव्यवस्थापक वींद्र शेट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.यावर्षीच्या दिवाळीसाठीचा बोनस शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचे बेस्ट प्रशासनाने मान्य केलेअसे हाके यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब