बाळासाहेबांची शिवसेना' एकनाथ शिंदेकडे, तर मशाल चिन्हासह 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ठाकरे गटाकडे

बाळासाहेबांची शिवसेना' एकनाथ शिंदेकडे,  तर मशाल चिन्हासह 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ठाकरे गटाकडे
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - 




निवडणूक आयोगाने 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे तर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे. उध्दव ठाकरे यांच्या गटाला  मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने चिन्हासाठी दिलेले तीन पर्याय फेटाळण्यात आले आहेत त्यामुळे त्यांना चिन्हासाठी नवीन पर्याय देण्यास सांगण्यात आले आहे. 


 शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा नवीन निर्णय घेतला आहे.
धनुष्यबाण व शिवसेना हातातून निसटलेल्या उध्दव ठाकरेंना आता नवीन नाव व नवीन चिन्ह घेऊन लोकांमध्ये जावे लागणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही