नाशिक मध्ये भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू

नाशिक मध्ये भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू
लोकमानस प्रतिनिधी 
नाशिक - नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. 
या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  
अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील  मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब