ईद मिलाद मिरवणूक, डीजे वर खर्च होणारा पैसा गरीबांच्या शिक्षणासाठी, अन्नासाठी खर्च करा, मौलाना मौईनुद्दीन अश्रफ यांचे आवाहन


ईद मिलाद मिरवणूक, डीजे वर खर्च होणारा पैसा गरीबांच्या शिक्षणासाठी, अन्नासाठी खर्च करा, मौलाना मौईनुद्दीन अश्रफ यांचे आवाहन

प्रतिनिधी

मुंबई-

प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद मिलादच्या मिरवणुकीत डीजे वाजवू नये व त्यासाठी होणारा खर्च गरीबांच्या शिक्षणासाठी व इतर समाजोपयोगी कार्यासाठी वापरावा, असे आवाहन मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांनी केले. ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा कौसा परिसरातील मौलाना, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी, यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आले होते. ईद मिलादच्या मिरवणुकीत काय करावे, काय टाळावे याबाबत विचारविमर्श करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ईद मिलादच्या वेळी डीजे लावणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पोलिसांची भेट घेईल, असे त्यांनी जाहीर केले.


       प्रेषितांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या ईद मिलाद मध्ये मोठ्या प्रमाणात दानधर्म करावा, डीजे, इतर गाणी लावू नयेत, व जास्तीत जास्त सामाजिक कार्यावर भर द्यावा, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

यावेळी मौलाना अश्रफ म्हणाले, प्रेषितांच्या शिकवणीप्रमाणे ही मिरवणूक काढणे गरजेचे आहे, प्रेषितांच्या शिकवणीविरोधात जावून कोणतेही कृत्य होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. रुग्णालयात जावून रुग्णांना फळवाटप करणे, गरीबांना आर्थिक मदत करणे, विद्यार्थ्यांचे शुल्क भरणे, गरीब मुलींच्या लग्नासाठी आवश्यक ती मदत करणे, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचारांचा खर्च करणे अशा समाजोपयोगी कार्यामध्ये पैसा वापरणे आवश्यक आहे. नागरिकांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करु नये, असे आवाहन त्यांनी केले. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही