मुलायम सिंग यादव यांचे निधन

 

मुलायम सिंग यादव यांचे निधन  

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मुलायमसिंह यांच्या निधनाने उत्तरप्रदेशच्या राजकारणातील एक पर्व संपुष्टात आले आहे. २२ नोव्हेंबर १९३९ ला सैफई गावात त्यांचा जन्म झाला होता.

 


उत्तरप्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. त्याशिवाय केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.

 

 

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

 मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते.  व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वी पासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ठ परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही