टिळक नगर परिसराची स्वच्छता दहा दिवसाच्या आत करा: - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

  टिळक नगर परिसराची स्वच्छता दहा दिवसाच्या आत करा: - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश      
                          
  मुंबई : चेंबूर येथील  खुल्या मैदानाची देखरेख करावी आणि बिल्डिंग ९२ ते १११ टिळक नगर परिसराची  मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दहा  दिवसाच्या आत   स्वच्छता करावी,असे  निर्देश  मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी   दिले.

        एम वेस्ट वॉर्ड,चेंबूर येथे  पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार प्रकाश फार्तेपकर,  सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  चेंबूर येथील अक्षय चव्हाण यांनी खुल्या मैदानाची देखरेख व बिल्डिंग ९२ ते १११ टिळक नगर परिसराची स्वच्छता  करण्यात यावी अशी तक्रार केली होती.याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दहा  दिवसाच्या आत, परिसराची स्वच्छता करण्यात यावी असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.
    
   हामसा सोसायटी, पेस्टम सागर येथील लक्ष्मीशहा सालीयन यांनी जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील जागेवर अनधिकृत झोपडपट्टी हटविण्याबद्दल तक्रार केली होती.याबाबत  मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सात दिवसांच्या आत अनधिकृत झोपडपट्टी हटवून, कंपाउंड भिंत उभी करावी.

चेंबूर येथील हरेश शहा यांनी  पेस्टम सागर भागात बिट पोलिस चौकी उभारण्याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार  नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ बिट पोलिस चौकी उभारण्या त यावी.

चेंबर कॅम्प मुंबई  येथील सैय्यद नूर मोहम्मद रमजान यांनी  आर सी बॅरेक शासकीय जागेवर ठेकेदाराने अनधिकृत बांधकाम करुन खोटे पुरावे उभे केले आहेत यावरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक महिन्याच्या आत संबंधित जागेची व कागदपत्रांची पडताळणी करुन, अनधिकृत बांधकाम हटविण्या त यावे असे निर्देश पालकमंत्री
लोढा यांनी दिले

     नागरिकांनी ११९  विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले.तर  यामधील  ७५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या  समोर  उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

सतीश कुमार  चौबे यांनी मानले पालकमंत्री यांचे आभार

एम. ईस्ट वॉर्ड,गोवंडी ( पूर्व) येथे  १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी झालेल्या  'पालकमंत्री आपल्या दारी' या बैठकीत सतीश कुमार  चौबे यांनी शिधापत्रिकेसंदर्भात तक्रार दिली होती. ही केशरी शिधापत्रिका ऑनलाईन डेटा एन्ट्री झाली नसल्याबाबत तक्रार होती. या शिधापत्रिकेचे संगणकीकरण करून देण्यात आले आहे अशी माहिती यावेळी शिधावाटप अधिकारी यांनी पालकमंत्री यांना दिली.या तक्रारीचे निवारण केल्याबद्दल चौबे यांनी पालकमंत्री यांचे व  प्रशासनाचे आभार मानले आहेत.

        'पालकमंत्री आपल्या भेटीला' हा उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही  जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in  बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.
       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही