माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

प्रतिनिधी

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या ११ महिन्यांपासून ते कोठडीत होते. ईडी ने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्याच्या आत निर्णय देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते.

१०० कोटी रुपये खंडणी वसूली प्रकरणी आरोप झाल्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते आत होते.

मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमवीर सिंह व बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना कथितरित्या १०० कोटी खंडणी वसूलीचे आदेश दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.  १ लाख रुपयांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आला आहे. 

देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप सुनावणी सुरु आहे. त्यामुळे तोपर्यंत देशमुख तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. ईडी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही