शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले, शिवसेना नाव वापरण्यास मनाई


शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले, शिवसेना नाव वापरण्यास मनाई,
शिंदे व ठाकरे गटाला धक्का 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने तात्पुरते गोठवले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे  आणि एकनाथ शिंदे यांच्या लढाईत दोन्ही गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे  शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गट हे चिन्ह वापरु शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने घेतलेला हा  निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. शिवसेना हे नाव देखील वापरु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.  
अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या चिन्हासाठी 10 ऑक्टोबर पर्यंत दावा करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही