महानगरपालिका अंतर्गत सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

महानगरपालिका अंतर्गत सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या , संपादित केलेल्या भाडेतत्वावरील निवासी  तसेच अनिवासी गाळेधारकांच्या  मालमत्तांचे भाडे परिगणनाबाबत, हस्तांतरण शुल्क, अनामत रक्कम याबाबत  सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती मिळाली असून मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रश्नाबाबत सातत्याने केलेल्या  पाठपुराव्यामुळे हे  यश मिळाले आहे.
      
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येणा-या सर्व वसाहती ची भाडेतत्वावरील निवासी तसेच  अनिवासी मालमत्तांच्या भाडे परिगणना व हस्तांतर शुल्क तसेच अनामत रक्कम यात शिवसेनेच्या सरकारने  मोठी वाढ  केली होती.हा निर्णय कोणाला समजणार नाही असे तत्कालीन सरकार असलेल्या शिवसेनेला वाटले होते.मात्र निवडणुका पुढे गेल्यामुळे हा निर्णय लोकांना समजला.ही दर वाढ अन्याय कारक आहे. ही दरवाढ  रद्द व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार  महापालिकेला निवेदन देवून केली होती.
टच
        ही दरवाढ अन्यायकारक आहे असे महापालिका आयुक्तांना निवेदन देवून सातत्याने सांगितले या लढ्याला यश आले आहे. भाडेवाढ व शुल्कवाढ रदद करण्याबाबतच्या विनंतीचा विचार करुन  महापालिका आयुक्तांनी  सुधारित भाडेवाढीस व शुल्कवाढीस ३१ मार्च २०२३ पर्यंत स्थगिती दिली आहे. भाडेवाढ व शुल्कवाढ रदद  होई पर्यंत हा लढा असाच कायमस्वरूपी राहील, असेही पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही