पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ,देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री पदी

इमेज
एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री पदी लोकमानस प्रतिनिधी  मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी   राजभवनात शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करताना फडणवीस यांनी ते मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होेते. मात्र त्यानंतर भाजप नेतृत्वाने फडणवीस यांना उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे निर्देश दिले.  भाजपच्या या धक्कातंत्राने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शिंदे यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा प्रथमच सन्मान लाभला आहे. तर, मुख्यमंत्री पदी पाच वर्षे काम केल्यानंतर उप मुख्यमंत्री होणारे पहिले राजकारणी म्हणून फडणवीस यांची राज्यात नवी ओळख तयार झाली आहे. राज्यात आतापर्यंत ज्यांनी उप मुख्यमंत्री पद भूषवले आहे त्यांना त्यांच्या पुढील राजकीय आयुष्यात मुख्यमंत्री पद मिळालेले नाही, असा महाराष्ट्राचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे पुढील काळात

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

इमेज
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लोकमानस प्रतिनिधी मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज शपथ घेतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप शिंदे यांना समर्थन देईल व आज सायंकाळी साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल, असे त्यांनी जाहीर केले.   शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपला प्रस्ताव राज्यपालांना सादर केला आहे. भाजपच्या समर्थनाने शिंदे मुख्यमंत्री होतील, असे   फडणवीस यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदेंचे मुंबईत आगमन, आज सायंकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

  एकनाथ शिंदेंचे मुंबईत आगमन, आज सायंकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार लोकमानस प्रतिनिधी मुंबई – राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज सायंकाळी सात वाजता शपथ घेतील अशी माहिती सुत्रांनी दिली. शपथविधीची तयारी राजभवनवर सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर शिंदे हे फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर गेले व तिथे शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. बंडानंतर गोव्यामार्गे मुंबईत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. शिवसेना नेत्यांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.  

मुंबई पोलिस आयुक्त पदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती

इमेज
मुंबई पोलिस आयुक्त पदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती लोकमानस प्रतिनिधी मुंबई-  मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस आयुक्त संजय पांडे हे गुरुवारी ३० जून रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या रिक्त होत असलेल्या पदावर फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसाळकर यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. ते सध्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अर्चना त्यांगी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. फणसाळकर हे गुरुवारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतील.

उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा

उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा लोकमानस प्रतिनिधी मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्री फेसबुक लाईव्ह करुन जनतेशी संवाद साधला व शेवटी मुख्यमंत्री पदाचा व विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला. यापुढे शिवसेना भवनात पूर्वीप्रमाणे बसून पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेने व शिवसेना प्रमुखांनी ज्यांना मोठे केले त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरवले याचा आनंद त्यांनी घ्यावा, असा टोला त्यांनी बंडखोरांना लगावला. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला नाही याचा उल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत सहकार्य केल्याबद्दल सर्वसामान्य जनता, प्रशासकीय अधिकारी व पोलिसांचे त्यांनी आभार व्यक्त केले.  उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे साधलेला संवाद  मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हण

नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी

नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी लोकमानस प्रतिनिधी मुंबई मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख या तुरुंगात असलेल्या आमदारांना बहुमत चाचणीसाठी मतदानाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. बहुमत चाचणीसाठी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी देशमुख व मलिक यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.

बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, उद्या बहुमत चाचणी होणार

बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार,  उद्या बहुमत चाचणी होणार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या गुरुवारी होणाऱ्या बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.  ठाकरे सरकारचे भवितव्य आता  बहुमत चाचणीवर अवलंबून आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय  लोकमानस प्रतिनिधी मुंबई- विधानसभेच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बहुमत चाचणी अवलंबून असल्याने उध्दव ठाकरे यांनी नामांतराची प्रलंबित मागणी पूर्ण केली. अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या ठाकरे यांनी नामांतराच्या मागणीची पूर्तता त्यांचे सरकार अस्थिर झाल्यावर केली, हे विशेष.  शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिल्याने व इतक्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार फुटल्याने ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत शिवसेनेची सौम्य झालेली  हिंदुत्ववादी ओळख गडद करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करा व बहुमत सिध्द करा, राज्यपालांचे निर्देश राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

  गुरुवारी  विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करा व बहुमत सिध्द करा, राज्यपालांचे निर्देश राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका लोकमानस प्रतिनिधी मुंबई-   विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला गुरुवारी ३० जून रोजी बहुमत सिध्द करण्याचे निर्देश दिले आहेत. काही आमदारांनी   देखील राज्यपालांना मेल पाठवून बहुमत चाचणीची मागणी केली होती. राज्यपालांनी विधानभवनाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र लिहून ३० जून रोजी विधिमंडळाचे एकदिवसीय अधिवेशन आयोजित करावे व त्यामध्ये सरकारने बहुमत सिध्द करावे, असे निर्देश दिले आहेत. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला प्रारंभ करावा व सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामकाज आटोपण्यात यावे असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता विधान भवनाच्या आत व बाहेर पुरेसा बंदोबस्त ठेवावा असे राज्यपालांनी पत्रात लिहिले आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात तातडीने अधिवेशन बोलावण्याच्या व बहुमत चाचणी घेण्याच्या   राज्यपालांच्या या निर्देश

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट,सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगण्याची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगण्याची मागणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली.  या पत्रात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. - भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. - शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे. - दुसरीकडे शिवसेनेच्या

राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी, ११ हजार मेवॅ वीज निर्मिती होणार

इमेज
राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी,  ११ हजार मेवॅ वीज निर्मिती होणार अदानी समुहासोबत  सामंजस्य करार पम्पड स्टोरेज प्रकल्पात ६० हजार कोटींची गुंतवणूक  उर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांचा पुढाकार मुंबई- महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा  अतिशय महत्वाचा निर्णय राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला आहे. येत्या ५ वर्षात राज्यात तब्बल ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. अदानी उद्योग समुहातर्फे ही वीज निर्मिती केली जाणार आहे. जागतिक आर्थिक परिषदेत ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणणारे ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी यानंतर अवघ्या महिनाभरात पुन्हा ६० हजार कोटींची गुंतवणूक क्षेत्रात आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात १ लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह (एजीईएल) यांच्यात आज ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार करण्यात आला. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात व हरित ऊर्जा क्षेत्रात नवी उंच भरारी

कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची इमारत पडण्याची घटना दुर्दैवी

कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची इमारत पडण्याची घटना दुर्दैवी  लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एल विभाग' कार्यक्षेत्रातील कुर्ला परिसरात असणारी 'नाईक नगर सहकारी संस्था'ची इमारत' कोसळल्याची दुर्देवी घटना २७ जून २०२२ रोजी रात्री उशीरा घडली. या घटनेमध्ये १४ व्यक्तिंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १३ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमी व्यक्तिंपैकी ९ व्यक्तिंवर आवश्यक ते उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात व शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात अनुक्रमे ३ व १ जखमी व्यक्तिंवर उपचार सुरु आहेत. तसेच या अनुषंगाने सदर इमारतीच्या परिसरात मदत व बचाव कार्य अव्याहतपणे सुरु आहे.   या घटनेबाबत व सदर इमारतीबाबत महत्त्वाची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दि. २७ जून २०२२ रोजी रात्री ११.५२ वा. या दुर्देवी घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त झाली. त्यानंतर लगेचच बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्

कुर्ला इमारत दुर्घटनेत १४ जणांचा बळी, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

  कुर्ला इमारत दुर्घटनेत १४ जणांचा बळी लोकमानस प्रतिनिधी मुंबई - कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचे निधन झाले. कुर्ला बस स्थानकाजवळील शिवसृष्टी रोडे येथील नाईक नगर सोसायटी इमारत ही तीन मजली इमारत   रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोसळली. अग्निशमन   दल, एनडीआरएफ जवानांनी तत्काळ पोचून मदतकार्य सुरु केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २७ जखमींना बाहेर काढण्यात आले त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला. जखमींवर राजावाडी रुग्णालय, शीव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत मृतांबाबत मुख्यमंत्र्यांची सहवेदना, जखमींच्या उपचारांबाबतही दिले निर्देश  मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दूर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  मुख

शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची टोरेंट पॉवर द्वारे विशेष तपास मोहीम

शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची टोरेंट पॉवर द्वारे विशेष तपास मोहीम मुंब्रा -  शिळ-मुंब्रा-कळवा परिसरातील 30 हजार हून अधिक वीज मीटर सतत अनपेक्षितपणे कमी वापरासाठी टोरेंट पॉवर लिमिटेड च्या तपास यादीत आलेले आहेत. यापैकी 20 हजार मीटरचा वापर शून्य असल्याने टीपीएलचे अधिकारी संशयग्रस्त झाले आहेत. उर्वरित 10 हजार मीटरचा वापर 0-30 च्या श्रेणीत आहे जो देखील एक विसंगती मानला जातो. या संशयास्पद मीटरच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहिमेचे आदेश देण्यात आले आहेत. अपवादात्मकपणे कमी वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरोघरी भेटी देऊन, ग्राहकांनी मीटरमध्ये गैरप्रकार केले असल्यास, ते ओळखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी काही खरी प्रकरणे असू शकतात ज्यात ग्राहकांकडून विजेचा खप वास्तविक कमी आहे.  शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची सध्याची संख्या खूप जास्त आहे आणि मीटर बायपास, मीटरमध्ये छेडछाड, थेट/अनधिकृत वापर इत्यादीसारख्या गैरप्रकारांमध्ये काही ग्राहक गुंतलेले असतील याची शक्यता नाकारता येत नाही, वा काही दोषी आढळ्यास टोरेंट द्वारे दोषींविरुद्ध विद्युत कायदा 2003 च्या संबंधित

सरकार वाचवण्यासाठी उध्दव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांचा फोन, खोडसाळ वृत्त, चुकीच्या बातम्या पसरवू नका- शिवसेनेचा खुलासा

  सरकार वाचवण्यासाठी उध्दव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांचा फोन, खोडसाळ वृत्त, चुकीच्या बातम्या पसरवू नका- शिवसेनेचा खुलासा लोकमानस प्रतिनिधी मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करुन संवाद साधल्याचे वृत्त खोडसाळ व चुकीचे असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदत मागितल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही, असा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख   हर्षल प्रधान यांनी केला आहे. अशा प्रकारच्या बातम्या या निव्वळ भूलथापा आहेत, उध्दव ठाकरे जे काही बोलायचे ते खुलेआम बोलतात, त्यामुळे कोणीही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करु नये व कोणीही गैरसमज करुन घेऊ   नये, असे आवाहन हर्षल प्रधान यांनी केले आहे.

बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुदतवाढ, राज्यातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात

  बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुदतवाढ, राज्यातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात लोकमानस प्रतिनिधी मुंबई - गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र का ठरवू नये यासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. त्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीमध्ये   सोमवारी या प्रकरणी १६ बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुदत वाढवून दिली आहे.   सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी व प्रतोद सुनील प्रभू यांना उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होईल.   सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वकिलांनी १२ जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत चाचणी होणार नाही, याची हमी देण्याची मागणी केली मात्र तशी हमी देण्यास न्यायालयाने नकार दिला व आवश्य

राज्याबाहेर असलेल्या मंत्री, आमदारांना जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्यात परतण्याचे आदेश द्या, उच्च न्यायालयात याचिका

  राज्याबाहेर असलेल्या मंत्री, आमदारांना जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्यात परतण्याचे आदेश द्या, उच्च न्यायालयात याचिका लोकमानस प्रतिनिधी मुंबई – गेल्या आठवड्याभरापासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर मंत्री व आमदार आपल्या कर्तव्यापासून दूर असल्याने त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्यात परतण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.   याचिकेत एकनाथ शिंदे यांच्यासहित महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या   तिन्ही पक्षांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली असून संबंधितांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. एड. असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे.    

वक्फ बोर्डाचे सीईओ अनिस शेख यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश

क्फ बोर्डाचे सीईओ अनिस शेख यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश, वक्फ बोर्डाची जमीन विक्री व शेख यांच्या चौकशीचे निर्देश चौकशी करुन गुन्हा नोंदवण्याची हाजी अरफात शेख यांची मागणी   लोकमानस प्रतिनिधी  – मुंबई   महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांच्या कार्यकाळात  वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनींची अवैध विक्री झाल्याप्रकरणी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे व त्यांची व जमीन विक्रीची चौकशी करावी, असे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी याबाबत आव्हाड यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची व इतर भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करावी, त्यांना निलंबित करावे व त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हाजी अरफात शेख यांनी केली होती. याबाबत आव्हाड यांनी दिलेल्या निर्देशामध्ये, वक्फ बोर्डाच्या जमिनी सार्वजनिक वापरासाठी राखीव असतानाही शेख यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे त्या

गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० बसेस सोडणार २५ जूनपासून आरक्षण सुरु

  गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० बसेस सोडणार २५ जूनपासून आरक्षण सुरु   लोकमानस प्रतिनिधी    मुंबई   –  ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई ,  ठाणे ,  पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दिली. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री, ॲड.परब यांनी केले.      गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणप

शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती वैध, विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे न्यायालयात दाद मागणार

  शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती वैध, विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे न्यायालयात दाद मागणार   लोकमानस प्रतिनिधी मुंबई – शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे   शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती वैध ठरली आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवून त्या पदावर शिवसेनेचे निष्ठावान आमदार अजय चौधरी यांना नियुक्त करण्याबाबत पत्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना देण्यात आले होते. त्यावर उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय विधिमंडळ सचिवालयातर्फे अवर सचिव (समिती) यांनी कळवला आहे. एकनाथ शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे उच्च न्यायालयात दाद मागतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे सरकार यावे व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हाजी अली दर्गाह मध्ये प्रार्थना, हाजी अरफात शेख यांच्याकडून तीन दिवसांपासून प्रार्थनेचे आयोजन

  भाजपचे सरकार यावे व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हाजी अली दर्गाह मध्ये प्रार्थना, हाजी अरफात शेख यांच्याकडून तीन दिवसांपासून प्रार्थनेचे आयोजन लोकमानस प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर यावे व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुंबईतील हाजी अली दर्गाहमध्ये विशेष दुआ करण्यात आली. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भाजपच्या वाहतूक आघाडीचे प्रमुख हाजी अरफात शेख यांच्यातर्फे या विशेष दुआचे आयोजन करण्यात आले होते.   देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात व अल्पसंख्याक समाजाचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, अशी प्रार्थना हाजी अरफात शेख यांनी केली. कामगार, शेतकरी, वाहतूकदार व इतर सर्वसामान्य जनतेला सुखी समाधानी जीवन जगता यावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात येणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी हाजी अली दर्गाह मध्ये सलग तीन दिवसांपासून प्रार्थना केली जात असल्याची माहिती हाजी अरफात शेख यांनी 'लोकमानस' शी बोलताना दिली. सलग तीन दिवसांप

ठाकरे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल- शरद पवार

ठाकरे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल - शरद पवार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  -  अशी परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला शिवाय जनतेसाठी चांगले निर्णयही घेतले. कोरोना या राष्ट्रीय संकटात आरोग्य विभागाने परिस्थिती चांगली हाताळली त्यामुळे अडीच वर्षात हा प्रयोग फसला हे म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान आहे असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला. ज्यावेळी आमदार राज्याबाहेर गेले ते इथे आल्यानंतर ज्यापध्दतीने त्यांना नेण्यात आले ही वस्तुस्थिती सांगतील व शिवसेनेसोबत भूमिका स्पष्ट करतील व बहुमत कुणाचे आहे हे सिद्ध होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.  बंडखोर आमदारांनी इथे येऊन बोलले पाहिजे आसाममध्ये राहून नाही असे खडेबोलही शरद पवार यांनी सुनावले. तसेच शि

दिपक केसरकर, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर देखील गुवाहटीत दाखल

  दिपक केसरकर, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर देखील गुवाहटीत दाखल लोकमानस प्रतिनिधी मुंबई- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या  गटाची ताकद सातत्याने वाढत आहे. मुंबईतील आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर, आशिष जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामिल झाले आहेत. हे आमदार शिंदे यांच्या गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी येथे दाखल झाले. एकनाथ शिंदे व इतर आमदारांनी त्यांचे हॉटेलमध्ये स्वागत केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा जनतेशी संवाद , शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा जनतेशी संवाद शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार, शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडण्यास तयार कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका लोकमानस प्रतिनिधी मुंबई-  माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह. बोलण्यासारखे बरेच. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही अशा परिस्थितीत मला जे करायचे ते  प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. माध्यमात अनेक अफवा. मी भेटत नव्हतो हे काहा दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयात. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य , एकनाथ शिंदे अयोध्येला. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यात आली. २०१४ मध्ये एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मध्ल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने. आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हा